पुणे : सिलपॉलीन या प्लॅस्टिक ताडपत्र्यांना महाराष्ट्रात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुप्रीम इंडस्ट्रीज लि. च्या या प्लॅस्टिक ताडपत्र्या वेगवेगळ्या जाडीमध्ये उपलब्ध आहेत. जसे ४५, ७०, ९०, १२०, १५०, २००, २५० व ३०० जी. एस. एम. मध्ये पाहिजे त्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. कमी अधिक जाडीमध्ये सिलपॉलीन सर्वत्र मिळत असल्याने याचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करता येतो. सिलपॉलीनच्या ताडपत्र्या आवश्यकतेनुसार त्या-त्या आकारात तयार करता येतात. सिलपॉलीन ताडपत्र्या दिसायला पातळ, वजनाला हलक्या, परंतु जबरदस्त ताकदीच्या व जास्त टिकाऊ आहेत. सिलपॉलीन स्वीस टेक्नॉलॉजीने तयार केल्या असून बी. आय. एस (आय. एस.) स्टॅण्डर्स १४६११-२०१६ अनुसार बनविलेल्या आहेत. सिलपॉलीन ताडपत्र्यांना सुयोग्य प्रकारे यु. व्ही. स्टॅबीलाईज केले जाते, जेणेकरून जास्त उन्हात दीर्घकाळ टिकतात. सिलपॉलीन ताडपत्र्या या पेटंटेड उत्पादन असून १०० टक्के वॉटरप्रुफ आहेत. या ताडपत्र्या रिसायकलेबल व एनव्हायरमेंटल फ्रेंडली आहेत. बहुतेक प्रकारच्या केमिकल्सचा या ताडपत्र्यांवर परिणाम होत नाही. मागील काही महिन्यांपासून काही व्यापारी हलक्या प्रतीचे प्लॉस्टिक वापरुन सिलपॉलीनसारखी ताडपत्री तयार करुन बाजारामध्ये स्वत:च्या व्यक्तिगत फायद्यासाठी विक्रीला आणत आहेत. हे सिलपॉलीन सारखे दिसणारे असते; परंतु सर्वसाधारण एल.डी. प्लॉस्टीक आहे. त्यामुळे साधारण व्यक्ती जास्त पैसे देऊन निकृष्ट दर्जाची विकत घेत आहे. (वा.प्र.)
सुप्रीमच्या ‘सिलपॉलीन’ ताडपत्र्यांना प्रतिसाद
By admin | Updated: January 14, 2017 03:08 IST