शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

मंचरला कृषी प्रदर्शनास प्रतिसाद

By admin | Updated: January 9, 2015 23:20 IST

आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने आयोजित शेतकरी कृषी प्रदर्शनात आधुनिकता असून, शहरांच्या तोडीचे कृषी प्रदर्शन येथे भरविले जाते,

मंचर : आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने आयोजित शेतकरी कृषी प्रदर्शनात आधुनिकता असून, शहरांच्या तोडीचे कृषी प्रदर्शन येथे भरविले जाते, असे गौरवोद्गार शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी काढले. खरेदी-विक्री संघाच्या वतीने सलग पाचव्यांदा मंचर येथे आयोजित ‘शेतकरी कृषी प्रदर्शन २०१५’चे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. या वेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सभापती जयश्री डोके, सभापती प्रकाश घोलप, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे पाटील, बबनराव कुऱ्हाडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, युवक अध्यक्ष सचिन भोर, सूत्रसंचालन सभापती सुभाष मोरमारे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, सहायक निबंधक बी. आर. माळी, जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर, सुषमाताई शिंदे, प्रियंका लोखंडे, अध्यक्षपदी संजय गवारी, खंडू पारधी, महेश मोरे, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया आदी उपस्थित होते. शहा बोलताना पुढे म्हणाले, की येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा व बाहेरील शेतकरी येतात. विविध स्टॉलवर गर्दीतर होतेच, तसा व्यवसायही मोठ्या प्रमाणात होतो. यापुढील काळात शेतीला अजून महत्त्व येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची कृषी प्रदर्शने उपयुक्त ठरतील. यापुढे प्रदर्शनात तीन दिवस नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच कार्यशाळा सुरू करण्याची सूचना शहा यांनी केली. पोपटराव गावडे म्हणाले, की समाजासाठी व शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृषी प्रदर्शन उपक्रमाद्वारे विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघ चांगले काम करत आहे. सामान्य शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम संघामार्फत केले जाते. प्रास्ताविक करताना खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले, की मंचर येथे होणारे कृषी प्रदर्शन ग्रामीण भागात नावाजलेले आहे. कृषी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा व ते ग्रामीण भागात नावाजलेले आहे. कृषी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा व ते ग्रामीण भागात भरविण्याची संधी संघाला मिळाली आहे. त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच नीलेश थोरात यांनी आभार मानले. (वार्ताहर)