शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आपले तीन पक्षांचे सरकार सर्वांचा मान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आपले तीन पक्षाचे सरकार आहे, कोणाचा अवमान होईल असे वागू नका, असा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: आपले तीन पक्षाचे सरकार आहे, कोणाचा अवमान होईल असे वागू नका, असा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी जणू त्याचेच ‌उदाहरण म्हणून शिवसेनेला वर्धापनदिनासाठी व राहुल गांधी यांंना वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे हे कार्यालय पुणे शहराचे सांस्कृतिक व सर्व प्रकारचे व्यासपीठ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद‌्घाटन शनिवारी सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाले. खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच पक्षाचे आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पुण्यासाठी बरेच काही केले, बरेच काही करायचे आहे. पुण्यात रोजगार निर्माण व्हावा, यासाठी पुणे पिंपरी- चिंचवड यांचा पर्यटन विकास व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. सत्ता आपली आहे, पण तीन पक्षाची आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. कोणी काही बोलले तरी त्यांना उत्तर देण्याच्या फंदात पडू नका. राज्याचे नेते बोलतील असे म्हणा.

पवार साहेब फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करतात. ते सर्वांचा मान ठेवतात, आपणही करायला हवा असा सल्ला देऊन पवार म्हणाले, कार्यालयाची पायरी चढताना आपले वर्तन पक्षाची हानी करणारे नाही ना याचा विचार करा. कार्यकर्त्यांनी मन लावून काम केले असते तर आत्ता दोन ऐवजी तीन आमदार असले असते. मतभेद, गटतट नकोत. चांगले काम करायचे याकडे लक्ष द्या.

पवार यांच्या हस्ते पक्षाला मदत करणाऱ्या गिरे बंधू व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वागत व प्रास्तविक केले. अंकुश काकडे यांनी सुत्रसंचालन केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आभार व्यक्त केले.

---------------

गर्दी पाहून जाणार होतो

आपणच नियमावली करतो व ती मोडतो. मी सकाळी ७ वाजता येऊन जाणार होतो, आत्ताही गर्दी पाहून तसाच जाणार होतो, पण कार्यकर्त्यांचा उत्साह मोडवत नाही असे सांगत पवार यांनी आपण कोरोनाचे नियम मोडले याची खंत वाटते आहे असे सांगितले.