राजगुरुनगर येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजविकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, पी. टी. शिंदे, अमित घुमटकर, दीपक घुमटकर, उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, माजी तालुका पं. सदस्य, अॅड. अमृता गुरव, अॅड साधना बाजारे, अॅड. गौरी घुमटकर,जि. रं. शिन्दे, अंजना घुमटकर, मनीषा भुजबळ, कमला कळमकर आदी उपस्थित होते.
महात्मा फुले ब्रिगेड, वनविभाग आणि विविध संस्थाचे पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. डाॅ. छाया जाधव यांनी सावित्रीबाई कार्याचा परिचय ‘एकपात्री’ नाट्यप्रयोगांतून फुले दाम्पत्याच्या कार्याचे प्रेरणादायी प्रसंग सांगितले.
०७ राजगुरुनगर फुले
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.