शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मानाबरोबर ‘धना’तही वाढ

By admin | Updated: August 9, 2016 01:14 IST

पिंपरी - चिंचवड महापालिकेची विधी समितीची सभा सोमवारी झाली. त्यात १३३ नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार रुपयांवरून थेट ५० हजार रुपये करण्याचा ठराव मंजूर केला.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेची विधी समितीची सभा सोमवारी झाली. त्यात १३३ नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार रुपयांवरून थेट ५० हजार रुपये करण्याचा ठराव मंजूर केला. माजी आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनच्या धर्तीवर माजी नगरसेवकांनाही पेन्शन द्यावी, असे धोरण ठरविले आहे. राज्य सरकारने या ठरावास मान्यता दिल्यास महापालिका तिजोरीवर वर्षाला सहा कोटींचा भार पडणार आहे.महापालिकेत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नंदा ताकवणे होत्या. विधानसभा आणि विधान परिषद सभासदांच्या मानधनात झालेल्या भरीव मानधनाच्या धर्तीवर महापालिका सदस्यांच्या मानधनातही वाढ करावी, पदाधिकाऱ्यांच्या पदानुसार मानधनात वेळोवेळी वाढ करावी, माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन सुरू करावे, असे ठरावात नमूद आहे. नगरसेवकांच्या मानधनावर होणारा खर्च महापालिका सोसत असल्याने नवीन ठरावास मान्यता द्यावी, असा राष्ट्रवादी नगरसेवकांचा आग्रह आहे़ बृहन्मुंबई महापालिका वगळता उर्वरित २५ महापालिकांतील नगरसेवकांना साडेसात हजार रुपये दरमहा मानधन देण्याची तरतूद आहे. मात्र, महापालिकांतील नगरसेवकांना महागाईच्या झळा पोहोचत असल्याने दूरध्वनी बिल, लेटरपॅड, व्हिजिटिंग कार्ड आणि सध्याचे साडेसात हजार रुपयांचे मानधन अपुरे पडते, असा सूर आहे. नगरसेवकांच्या मानधनात वाढ करावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्या आर्थिक स्थितीला साजेसे पन्नास हजार रुपये मासिक मानधन मिळावे, असा ठराव विधी समितीने सोमवारी मंजूर केला.