शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

लाडक्या बाबांप्रति व्यक्त केला आदर

By admin | Updated: June 20, 2016 00:48 IST

‘तो एक बाप असतो. डोक्यावर ऊन झेलत सावली तो देत असतो. दणदणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वत: बाहेर फिरत असतो.

पिंपरी : ‘तो एक बाप असतो. डोक्यावर ऊन झेलत सावली तो देत असतो. दणदणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वत: बाहेर फिरत असतो. आईच्या मऊशार तळव्यामागचा तोच राकट हात असतो,’ अशा प्रकारच्या संदेशाचे आदानप्रदान करीत रविवारी जागतिक पितृ दिवस (फादर्स डे) सोशल मीडियावर उत्साहात साजरा केला गेला. वडिलांप्रति आदर व्यक्त करीत फादर्स डे उत्साहात साजरा झाला. सोशल मीडियावर वडिलांसोबतचे छायाचित्र आणि आठवणींचे लिखाण लोड करीत तरुणाईने वडिलांप्रति कृतज्ञता, स्रेह वृद्धिंगत केला. जागतिक फादर्स डे जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो. पाल्यांच्या पालनपोषणात आईसोबतच वडिलांचा वाटा तितक्यातच महत्त्वाचा आहे. जीवनभर काबाडकष्ट करीत कुटुंब जपत असतो. मुला-बाळांना काही कमी पडू नये म्हणून आपल्या आवडी आणि छंद बाजूला ठेवून त्यांना हवे ते साहित्य उपलब्ध करून देतो. परिस्थिती नसतानाही शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदीसाठी आर्थिक तडजोड करीत साहाय्य करतो. आईच्या प्रेमासोबत वडिलांची कणखर पाठिंबा मुलांना प्रोत्साहन देणारा आणि आत्मविश्वास वाढविणार असतो. बाबा, दादा, अण्णा, आप्पा, पप्पा, डॅडी या नावाने वडिलांना हाक मारली जाते. सहकुटुंब जेवणाचा आनंद घेत काही कुटुंबांनी आजचा दिवस साजरा केला. काहींनी वडिलांना भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त केली. वटपौर्णिमा आणि फादर्स डे एकाच दिवशी रविवारी आल्याने त्यात सुटी असल्याने कुटुंबातील सदस्यांनी आनंदात दिवस घालविला. कुटुंबांतील सदस्यांनी वडीलधारी मंडळींना शुभेच्छा दिल्या. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम असा सोशल मीडियावर आपल्या वडील आणि त्यांच्यासोबतचे छायाचित्रे मोठ्या प्रमाणात पोस्ट केले गेले. वडिलांसोबतच्या आठवणी शेअर केल्या गेल्या. त्यास असंख्य लाइक्स मिळाले. बाबांना दीर्घायुष्य लाभो, असे ही संदेश छायाचित्रासह सोशल मीडियावर फिरत होते. सकाळी सुरू झालेला हा सिलसिला रात्री उशिरापर्यंत कायम होता. निधन झालेल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत काहींनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. काहींनी संपूर्ण कुटुंबाचे छायाचित्र पोस्ट करीत कुटुुंबाचा आधारस्तंभ अशी उपमा देत कुटुंबप्रमुख बाबांप्रति आदर व्यक्त केला. (प्रतिनिधी)