शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

स्मार्ट सिटी सहभागाचा संकल्प

By admin | Updated: May 4, 2016 04:26 IST

महापालिकेचे कामकाज आॅनलाइन, स्वच्छ, लोकाभिमुख आणि गतिमान करण्याबरोबरच पर्यावरण समतोल राखणे, शहर वायफाय करणे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट

पिंपरी : महापालिकेचे कामकाज आॅनलाइन, स्वच्छ, लोकाभिमुख आणि गतिमान करण्याबरोबरच पर्यावरण समतोल राखणे, शहर वायफाय करणे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटीत शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करणार आहे, निष्पक्षपणे कामकाज करण्यावर भर देणार आहे, असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे वाघमारे यांनी आज दुपारी स्वीकारली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ग्रीन, क्लीन, वायफाय, स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आयुक्त म्हणाले, ‘‘नवी मुंबईशी मिळते-जुळते असे पिंपरी-चिंचवड शहर आहे. या शहरात औद्योगिकीकरण आहे, त्याचबरोबर मुंबईतील सिडकोसारखे प्राधिकरणही आहे. सुनियोजित विकास झाला आहे. सर्वश्रेष्ठ सुविधा येथे आहेत. स्वच्छतेचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे कारभार गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.’’ (प्रतिनिधी)पहिल्याच दिवशी आयुक्त कार्यरतपिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारताच त्यांनी महापालिका भवनातील कार्यालयांची पाहणी केली. तसेच विभागप्रमुखांची बैठक घेत कामकाजाची माहिती घेतली. मंगळवारी नवीन आयुक्त पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच अधिकारी व कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. सर्वांचीच धावपळ सुरू होती. दरम्यान, दुपारच्या वेळी दिनेश वाघमारे महापालिका भवनात आल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. पदाधिकारी, अधिकाऱ्यांंनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्तांनी चौथ्या मजल्यावर असलेल्या प्रशासन विभाग, दक्षता व नियंत्रण कक्षाला भेट दिली. तसेच कामकाजाची माहिती घेतली. त्यानंतर सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. ओळख करून घेण्यासह कामाचे स्वरूप जाणून घेतले. सुमारे दीड तास ही बैठक सुरू होती. अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई महापालिकेत अनधिकृत बांधकामांसाठी स्वतंत्र कक्ष आहे, त्याच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत राज्य शासनाचे जे नियोजन असेल किंवा न्यायालयाचे जे निर्देश असतील, त्यानुसार कारवाई केली जाईल. यापुढे होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई होईल. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र होईल.स्वच्छ, अमृत योजना राबविणारकेंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ आणि अमृत अशा विविध योजना सुरू आहेत. त्या शहरात राबविण्याचा प्रयत्न करीन. घनकचरा व्यवस्थापन सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना करू, नवी मुंबईत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवले, तसे प्रकल्प येथेही राबवले जातील. त्यातून उत्पन्न मिळाले नाही तरी चालेल. कचरा व्यवस्थापन केले जाईल.झोपडपट्टी भागात स्वच्छतागृहेस्वच्छता लक्षात घेता झोपडपट्टीच्या भागात ड्रेनेज लाइन व वैयक्तिक स्वच्छतागृह तयार करण्यावर भर राहील. त्यामुळे शहर अधिक स्वच्छ राहील. सर्व प्रभागांच्या कामांची वर्गवारी करून ती कामे त्या त्या प्रभागातच केली जावीत, याचे नियोजन केले जाणार आहे. त्यादृष्टिने योग्य ते प्रयत्न केले जातील.पक्षविरहित काम करणारकोणत्याही राजकीय पक्षाच्या आहारी जाऊन किंवा कोणत्याही पक्षाच्या विरुद्ध असे पक्षपातीपणे काम न करता नि:पक्षपातीपणे काम करण्यावर माझा भर राहील. माझ्यावर कोणत्याही पक्षाचा शिक्का नाही आणि नसेलही. तसेच माझे प्रशासन हे स्वच्छ व लोकाभिमुख असेल. नागरिक-लोकप्रतिनिधी-प्रशासन असा सुसंवाद असेल. त्यातून शहराचा विकास साधला जाईल.पाण्याचे नियोजन करणार‘यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे पाणीकपात केली आहे. पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजन करणार आहे. नियोजन केल्यास सध्या उपलब्ध साठ्यावर ३१ जुलैपर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकते.रखडलेले बीआरटी मार्ग लवकर सुरू करू. त्यांचे विस्तारीकरण करणे, इतर वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर राहील. सीसीटीव्ही बसविणार आहे.