शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

महिला सरपंचांविरोधातील ठराव फेटाळला

By admin | Updated: May 23, 2017 05:18 IST

बारामती तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आकांक्षा शिंदे यांच्याविरोधात मांडलेला अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आकांक्षा शिंदे यांच्याविरोधात मांडलेला अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला. यामुळे माजी सरपंच सुनील ढोले व उन्मेष शिंदे यांच्या गटाची सत्ता कायम राहिली आहे.वडगाव निंबाळकर येथील शिवाजी राजेनिंबाळकर, सोमेश्वरचे संचालक संग्रामसिंह राजेनिंबाळकर, राजकुमार शहा यांच्या गटातील आठ सदस्यांनी सरपंच विश्वासात घेऊन काम करीत नसल्याच्या कारणावरून तहसीलदारांकडे अविश्वास ठराव मांडला होता. यापूर्वी सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, याची चौकशी सुरू असताना सरपंचपदावरून हटवण्यासाठी सोळापैकी आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वासाचा ठराव मांडला. याबाबत सदस्यांची खास बैठक तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सोमवारी (दि. २२) येथील ग्रामसचिवालयात बोलावली होती. या वेळी ग्रामपंचायतीच्या सोळा सदस्यांपैकी सरपंच आकांक्षा उन्मेष शिंदे, अनिता शैलेंद्र जाधव, रोहिणी दत्तात्रेय झगडे, सुनील दत्तात्रेय ढोले, संगीता राजकुमार शहा, ज्योती मोहन हिरवे, जयश्री भीमाजी साळुंके, अर्चना नितीन राऊत, माणिक शंकर गायकवाड, मनोजकुमार यशवंत साळवे, धैर्यशील दिलीपसिंह राजेनिंबाळकर, रोहिदास सखाराम हिरवे असे बारा सदस्य उपस्थित होते.