शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे आंदोलन पुन्हा स्थगित

By admin | Updated: April 9, 2016 01:53 IST

विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या

भोर : विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या आंदोलकांना ११ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. कोणतेही ठोस आश्वासन न मिळताही दुसऱ्यांदा आंदोलन स्थगित करण्यात आले. पाडव्यामुळे आंदोलक कमी पोलीस अधिक अशी परिस्थिती होती.२५ मार्चला भाटघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी व धरणातून बेकायदेशीर पाणी खाली सोडल्याने सुमारे ४० गावांतील नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आलेल्या धरणग्रस्तांना अटक करून सोडून देण्यात आले होते. पुन्हा त्याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी भाटघर धरणग्रस्त आले होते. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलीस बळच अधिक प्रमाणात होते. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांच्याशी चर्चा केली. ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेतले. या वेळी नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, शाखा अभियंता देवडे, पोलीस अधिकारी धरणग्रस्त समितीचे सरचिटणीस आनंदराव सणस, भगवान कंक, काळुराम मळेकर, पार्वती धुमाळ, बबन गोळे, माऊली दानवले, श्यामराव धुमाळ, रामचंद्र हिरगुडे, मारुती रहाटवडे, कृष्णा बोडके, शंकर मळेकर, अशोक दानवले व धरणग्रस्त उपस्थित होते.