शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

अध्यक्षांची किंमत ठेवली नसल्यानेच राजीनामा

By admin | Updated: October 3, 2015 01:43 IST

साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही

प्रसन्न पाध्ये ल्ल पुणेसाहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही, हे वर्षातच जाणवल्याने परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. अध्यक्षांनीच पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केल्याने साहित्य वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. सभेचे अध्यक्ष या नात्याने निवेदन करीत असताना शेजवलकर यांनी, माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांच्या राजीनाम्यामागील कारणेही उघड केली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रा. मिरासदार यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक असे भांडण नव्हते. उगीच आरोप करायचे म्हणून सांगत नाही तर पदाधिकाऱ्यांचा कारभारच खटकत होता. त्याची जाहीर वाच्यता केली नाही. परिषदेत सत्ताकारण, राजकारण वाढू लागले होते. म. श्री. दीक्षित, गं.ना. जोगळेकर यांच्याबरोबर काम केले त्या वेळी परिषदेत साहित्यिक वातावरण होते. ते कायम राहिले नाही असे जाणवल्याने परिषदेतून बाहेर पडलो. शेजवलकर यांनाही असाच अनुभव आला असावा. म्हणूनच त्यांनी भर सभेत पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली असावी.’’मिरासदार म्हणाले, ‘‘अध्यक्षपाचा राजीनामा दिल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परिषदेच्या कारभारात तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल, असे सांगितले, पण मी निर्णयावर ठाम राहिलो.’’महाराष्ट्र साहित्य परिषदेत पाच वर्षांपूर्वी सत्तापरिवर्तन झाल्यानंतर परिषदेच्या अध्यक्षपाची धुरा मिरासदार यांच्याकडे पुन्हा सोपविण्यात आली होती. त्यापूर्वीही मिरासदार परिदषेचे अध्यक्ष होते. म. श्री. दीक्षित, गं. ना. जोगळेकर यांच्या काळात मिरासदारच अध्यक्ष होते.साहित्य परिषदेच्या परदेशवाऱ्या अनेक वेळा वादग्रस्त ठरल्या. घुमान येथील साहित्य संमेलनातही पदाधिकाऱ्यांनी ‘चमकोगिरी’ केली, असे आरोप केले जात आहेत. मिरासदार यांनाही हे अनुभव आले.त्यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी यांनी याबाबतच्या काही कटू आठवणी सांगितल्या. मंकणी म्हणाल्या, ‘‘पहिले विश्वसंमेलन अमेरिकेत झाले, त्या वेळी दादा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर बोलाविलेच गेले नाही. वास्तविक इतर शाखांचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. सिंगापूरला जेव्हा विश्व साहित्य संमेलन होणार होते, त्या वेळी त्यांना नेण्याचे टाळण्यात आले. पदाधिकाऱ्यांनीच त्यांची तब्येत बरी नसल्याचे कारण सिंगापूरच्या मंडळाच्या अध्यक्ष असलेल्या राजश्री लेले यांना सांगितले.’’ ‘‘राजश्री ही दादांची विद्यार्थिनी असल्याने ती भारतात आली तेव्हा त्यांना भेटायला आली. त्या वेळी तिला सर्व प्रकार समजला. त्यानंतर तिने गणेशोत्सवात सिंगापूर येथे दादांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला. पुण्यात साहित्य संमेलन झाल्यानंतर ८२ लाख रुपये मिळविण्यासाठी दादांनाच पुढे करण्यात आले होते,’’ असे मंकणी यांनी सांगितले.