शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमल्यामुळे रहिवासी चिंतेत

By admin | Updated: November 10, 2014 05:04 IST

नऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे

जयवंत गंधाले, हडपसरनऱ्हे येथील अनधिकृत इमारत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्व भागातील कदम-वाकवस्ती, हांडेवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगर आदी उपनगरांलगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होण्याच्या चर्चेने सदनिकाधारक घाबरले आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् पोटात भीती असल्याने रहिवासी चिंतेत आहेत. मात्र, ग्रामपंचायती व जिल्हा प्रशासनाने हात वर केले आहेत.महापालिका हद्दीलगतच्या गावांतील अनधिकृत बांधकामांचे इमले काही एका दिवसात तयार झालेले नाहीत. ग्रामपंचायतीचा आशीर्वाद अन् जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळेच अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. नवीन बांधकामाच्या जुन्या नोंदी करण्यात ग्रामपंचायतीने हात धुऊन घेतले आहे. मात्र, सर्वसामान्य नोकरदार व मध्यमवर्गीय परवडणाऱ्या घराच्या आशेने अनधिकृत बांधकामाला बळी पडले आहेत. त्यासाठी बिल्डर जितक्या प्रमाणात जबाबदार आहेत, तितकेच प्रशासनही आहे. मात्र, एखादी इमारत कोसळल्यानंतर पुन्हा सामान्य नागरिकांच्या घरावरच प्रशासनाचा हातोडा पडतो, अशी व्यथा नागरिकांना लोकमतशी बोलताना मांडली. महापालिका हद्दीत नव्याने ४३ गावांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये पूर्व भागातील कदम-वाकवस्ती, हांडेवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगरचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी नव्याने गावांचा समावेश करण्याची अधिसूचना काढली. त्यानंतर हद्दीलगतच्या गावांतील अनधिकृत बांधकामाला वेग आला आहे. उपनगरालगतच्या प्रत्येक गावात बेकायदा बांधकामे बिनदिक्कत सुरू आहेत. दोन-तीन मजल्यांची परवानगी घ्यायची आणि पाच-सात मजल्यांपर्यंत बांधकामे केली आहेत. ग्राहकांना सदनिकेची विक्री करताना नियोजन विभागाने बांधकाम सुरू करताना दिलेला परवाना दाखविला जातो. ग्राहकांची दिशाभूल करण्यात व्यावसायिक तरबेज आहेत. इमारती बांधताना कोणतेही नियम पाळलेले नसतात, त्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तर तातडीची सेवा देता येणेही अवघड होऊन बसत आहे.