शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहरवासीयांचे सुरू आहेत पाण्यावाचून हाल!

By admin | Updated: May 4, 2017 01:59 IST

वारंवार फुटणारी सिमेंटची पाइपलाइन, कमीदाबाने पाणीपुरवठा, खंडित होणारा वीजपुरवठा आणि नियोजनाचा अभाव यामुळे

भोर : वारंवार फुटणारी सिमेंटची पाइपलाइन, कमीदाबाने पाणीपुरवठा, खंडित होणारा वीजपुरवठा आणि नियोजनाचा अभाव यामुळे उन्हाळ्यात भोर शहरात पाण्यावाचून नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. नगरपालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले असून पालिकेच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन व जुनी अशा नळपाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मात्र, जुनी नळपाणी पुरवठा योजना साधारणपणे २५ वर्षांपूर्वीची आहे. सिमेंटचे पाइप वापरण्यात आले असून पाइप खराब झाले आहेत. शिवाय, सदरची पाइपलाइन शहरातून एसटी स्टँड, बजरंग आळी, नवीआळीतून पोलीस स्टेशनजवळून शंकर हिल येथील टाकीत सोडली आहे. शहरात सतत वाहनांची वाहतूक असून पाइपलाइनवरून जड वाहन गेल्यास पाइपलाइन वारंवार फुटते. यामुळे पाणीपुरवठा बंद राहातो. शहरात कमीदाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोटर शिवाय पाणीच चढत नाही. अनेकदा सकाळी सकाळीच पाणी येण्याच्या वेळीच वीजपुरवठा खंडित होतो.शहरातून जाणारी सिमेंटची पाइपलाइन शिवाजी विद्यालयाजवळ फुटल्याने मंगळवारी शहरात पाणी बंद होते. बुधवारी सकाळी नागरिक पाण्याची वाट बघत असतानाच सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित  झाला. दिवसाआड आलेले पाणी आल्यावर नागरिकांना थोडेसे पाणी मिळाले, तर शहरात ठरावीक ठिकाणीच हातपंप वगळता नगरपालिकेच्या पाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे एैन उन्हाळयात पाण्यावाचून नागरिकांचे हाल सुरु आहेत.शहरातून जाणारी सिमेंची फुटलेली पाइपलाइन जोडण्याचे काम सुरु असून उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्ष तृप्ती किरवे यांनी सांगितले.(वार्ताहर)