पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांची अपक्ष उमेदवारी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून, त्यांना इस्त्री हे चिन्ह मिळाले आहे़ भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टीने प्रभाग क्रमांक ७ ड मधून त्यांना पुरस्कृत केले आहे़ भोसले घराण्याच्या राजकारणातील प्रवेशाला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या वेळी या घराण्यातील कोणी तरी महापालिकेच्या सभागृहात असावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने आपण निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरण्याचा निर्णय घेतला़ राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भाजपाने तिकीट देण्याची तयारी दर्शविल्याने कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखत आपण उमेदवारी अर्ज दाखल केला़ परंतु, भारतीय जनता पक्षाचा एबीफॉर्म मिळूनही आॅनलाईन अर्ज भरण्यात झालेल्या तांत्रिक चुकीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना भाजपचे चिन्ह दिले नाही. राज्य निवडणूक आयोगाकडे अपीलात त्यांना भाजपचे चिन्ह बहाल करण्यात आले होते. मात्र, कॉँग्रेसने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरविल्यावर सर्वोच्च न्यायालयातही तो कायम झाला आहे. दरम्यान, भाजपाचे चिन्ह मिळू शकले नाही़ तरी भाजपाने आपली उमेदवारी पुरस्कृत केली आहे. प्रभागात नव्याने समावेश केलेल्या भागात अधिकाधिक मतदारांशी संर्पक साधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
रेश्मा भोसले यांचे इस्त्री चिन्ह कायम
By admin | Updated: February 14, 2017 02:19 IST