शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण प्रत्यक्षात येणे अवघड; पण श्रेयासाठी सुरू चढाओढ

By admin | Updated: January 9, 2017 03:42 IST

पुणे शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी नुकताच मंजूर केला़ त्यातील बदललेली काही आरक्षणे पुन्हा तशीच ठेवण्यात आली़ हा

पुणे : पुणे शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी नुकताच मंजूर केला़ त्यातील बदललेली काही आरक्षणे पुन्हा तशीच ठेवण्यात आली़ हा बदल आपल्यामुळेच झाला, असे सांगत सध्या शहरातील अनेक भागांत श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे़ त्यातील काही आरक्षणे तर खरोखरच प्रत्यक्षात येणार की नाही, अशी स्थिती असताना आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयाची ही चढाओढ जोरात सुरू आहे़ शहरातील अशा अनेक आरक्षणांपैकी गोखलेनगरमधील मॅफको कंपनीच्या आरक्षणावरूनही सध्या ही चढाओढ जोर धरू लागली आहे़ मॅफको कंपनीच्या जागेवर महापालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण विकास आराखड्यात टाकले होते़ शासनाच्या चोक्कलिंगम समितीने त्या जागेवर शैक्षणिक संकुलाचे आरक्षण टाकले होते़ शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात पुन्हा या जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे़ त्यावरून आता या जागेवर क्रीडा संकुल, नाट्यगृह आणि पोलीस चौकी उभारण्याच्या सर्वांच्या साक्षीने पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ प्रभागातील नागरिकांनी नोंदविलेल्या हरकतींचा मोठा परिणाम म्हणजे चोक्कलिंगम समितीने उठविलेले मैदानाचे आरक्षण शासनाला पूर्ववत करावे लागले, असा व्हॉट्स अ‍ॅप नगरसेवकाने सर्व ग्रुपवर टाकला़ त्यापाठोपाठ माजी नगरसेवकाने दुसरा व्हॉट्स अ‍ॅप विविध ग्रुपवर टाकला़ त्यात त्यांनी म्हटले, की २००७ पासून विकास आराखडा तयार करण्याचे काम पुणे महापालिकेत चालू होते़ त्यात गोखलेनगर भागातील मॅफको कंपनीच्या जागेवर मुलांसाठी क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्याची मागणी केली होती़ त्यानुसार आरक्षणाची मागणी मान्य करून मार्च २०१२ च्या निवडणुकीपूर्वी डिसेंबर २०११ मध्ये हे आरक्षण जाहीर झाले आहे़सध्या ही जागा वनविभागाने आपल्या ताब्यात घेतली असून, तिथे त्यांनी वृक्षारोपणास सुरुवातही केली आहे़ या जागी त्यांना लॅबोरेटरी उभारायची आहे़ याशिवाय गार्डन उभारण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे़ राज्यातील वनाखालील क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न शासनाचा सुरू आहे़ वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी एखाद्या प्रकल्पासाठी घ्यायची असेल तर त्याला थेट केंद्र शासनाची परवानगी आता घ्यावी लागणार आहे़ हे अतिशय किचकट आणि वेळखाऊ काम आहे़ त्यामुळे महापालिकेने जरी आरक्षण टाकले तरी ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता सध्या तरी खूपच अंधुक असताना येणारी निवडणूक पाहून श्रेयाची लढाई सुरू झाली आहे़