शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ऐनवेळच्या बदलाने राष्ट्रवादीत संताप

By admin | Updated: January 31, 2017 04:53 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीवरचे मळभ कमी होण्याऐवजी दाट झाले आहे. सोमवारी रात्री काँग्रेसचे नेते मुंबईत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पुण्यात

पुणे: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीवरचे मळभ कमी होण्याऐवजी दाट झाले आहे. सोमवारी रात्री काँग्रेसचे नेते मुंबईत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पुण्यात अशी स्थिती होती. त्यामुळे संयुक्त चर्चा झालीच नाही. रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण व महापौर प्रशांत जगताप यांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना कार्यकर्ते, पदाधिकारी त्रस्त झाले असल्याचे सांगितले.रविवारी रात्रीही दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झालीच नाही. स्वतंत्र बैठका मात्र झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या बैठकीत काँग्रेसला ६० जागा देण्याचा निर्णय घेतला. कोंढवा येथील काँग्रेसचे रईस सुंडके यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला आहे. तेथील सर्व जागा हव्यात असा काँग्रेसचा आग्रह आहे, तर राष्ट्रवादीलाही त्या सर्व जागा लढवायच्या आहेत. तरीही त्यांनी दोन जागा देण्याची तयारी दाखविली, मात्र काँग्रेसने त्याला नकार दिला. अखेर राष्ट्रवादीने बाकी जागा आघाडी करून लढवू व त्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढत करू असा प्रस्ताव दिला. मात्र त्यावर काँग्रेसने काहीच विचार केला नाही. तसेच ऐन वेळी काही जागांमध्ये बदल करून हवा, असे पत्र दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही ताठर भूमिका घेतली आहे. सोमवारी दुपारी मुंबईत संयुक्त बैठक होणार आहे असे सांगण्यात आले, मात्र आज दिवसभरात अशी बैठक झालीच नाही. पवार रात्री पुण्यातच होते, तर काँग्रेसच्या पार्लमेंटरी कमिटीची बैठक मुंबईत सुरू होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच कमिटीचे अन्य ज्येष्ठ सदस्य या वेळी उपस्थित होते. त्यात छाननी समितीने दिलेल्या उमेदवार यादीवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)