ग्रीन पार्क वृद्ध-आश्रमामध्ये प्रजासत्ताक दिनाला कर्नल पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष उत्तमराव भोंडवे होते. यावेळी शिरूर हवेली प्रासादिक दिंडी अध्यक्ष विलास खांदवे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे कार्राध्यक्ष शरद पाबळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी डी. एम. झुरुंगे, डॉ. अमोल मेहता आदी उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देशभक्ती गीते सादर केली. तसेच उकृष्ट काम करणाऱ्या कामगारांचा पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी संचालक बाळासाहेब कंद यानी स्वागत केले. डॉ. निलीमा तेली यांनी सूत्रसंचालन केले.
--
फोटो क्रमांक : २७ पेरणे फाटा वृध्दाश्रम प्रजासत्ताक
फोटो ओळी- पेरणे फाटा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्नल श्रीनिवास पांडे यांनी ध्वजास अभिवादन केले.