पुणे : स्वारगेट चौकातील उड्डाणपुलाची अलाईमेट बदलली आहे, पुलाचा पिलर सरकला आहे का? याबाबत सभासदांनी महापालिका प्रशासनाकडे विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला व्यवस्थित उत्तर न देता आल्याने महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी संबंधित पुलाच्या सुरक्षेतेबाबत सविस्तर सादरीकरणाचे आदेश दिले. पुलाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून सर्व खुलासा घेण्यात यावेत, अशी सुचना त्यांनी केली.स्वारगेट उडडणपुलाचा पिलर सरकला असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून पुल नकाशाप्रमाणे बनविण्यात आला आहे, का याची माहिती पथ विभागाकडे मागितली असता ती देण्यात आली नसल्याचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात सांगितले. महापालिकेने पुलासाठी ४० कोटी रुपये मोजले असताना तो पुल कसा बनविला जात आहे याचा नकाशा पालिकेकडे उपलब्ध नसावा ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. अखर्चित रकमेतून वर्गीकरणास विरोध पुणे महापालिकेच्या बजेटच्या अखर्चित रकमेमधून बेकायदेशीर वर्गीकरण करता येते का, असा सवाल काही नगरसेवकांनी केला. त्यावर या वर्र्गीकरणाला विरोध करुन ती पुढे ढकलण्यात आली. अखर्चित रकमेमधून वर्गीकरण करू नये. त्याऐवजी पालिकेचे अंदाजपत्रक बदला, अशी भावना चेतन तुपे, पृथ्वीराज सुतार यांच्यासह अनेक सभासदांनी व्यक्त केली. पालिका हद्दीत समाविष्ट ३४ गावांसाठी बजेटमध्ये तरतुद होती. हे पैसे सर्व प्रभागासाठीच उपलब्ध करुन यावे अशी मागणी मनसेच्या नगरसेवकांनी केली.
‘स्वारगेट उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा अहवाल द्या’
By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST