शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उपकाराची परतफेड

By admin | Updated: January 8, 2017 03:29 IST

नगरसेवकांच्या वशिल्यावर शिपाई, आरोग्य कर्मचारी, लिपिक अशा कोणत्या ना कोणत्या पदावर महापालिकेत नोकरी मिळवली. त्यांनतर कधी बदली थांबविण्यासाठी तर कधी पदोन्नती

पिंपरी : नगरसेवकांच्या वशिल्यावर शिपाई, आरोग्य कर्मचारी, लिपिक अशा कोणत्या ना कोणत्या पदावर महापालिकेत नोकरी मिळवली. त्यांनतर कधी बदली थांबविण्यासाठी तर कधी पदोन्नती मिळविण्यासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची ज्यांनी मदत घेतली. असे महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी उपकाराच्या परतफेडीसाठी सज्ज झाले आहेत. अर्थात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची निवडणुकीसंबंधी काम करण्यात ते सध्या व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. पालिकेतील ‘ड्युटी’वर येण्यापूर्वी सकाळीच अथवा ड्युटी संपल्यावर नगरसेवकांच्या कार्यालयावर त्यांना हजेरी लावणे भाग पडत आहे. पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. निवडणूक विभागात आणि अन्य विभागांत काम करणारे, परंतु निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असलेले महापालिका कर्मचारी, अधिकारी विशिष्ट लोकांच्या मर्जीनुसार काम करतात, ही बाब निदर्शनास आणून देणारे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांनी महिनाभरापूर्वीच निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने महापालिकेला दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेत काही अधिकारी उपकाराच्या ओझ्याखाली काम करीत आहेत. काही नगरसेवक, पदाधिकारी यांचे महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. निवडणूक विभागात आणि निवडणुकीशी संबंधित कामाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून पारदर्शी काम होईल, याची शास्वती नाही. वर्षानुर्षांचे संबंध असलेल्या या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा ऐन निवडणुकीत आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी खुबीने वापर करून घेत आहेत. अगदी थेट प्रचारात पक्षाचा झेंडा घेऊन उतरण्याचेच बाकी आहे. महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी आतापासूनच छुप्या प्रकारे प्रचार यंत्रणेत राबू लागले आहेत. शक्य तेवढा वेळ ते उपकाराची परतफेड करण्यात घालवू लागले आहेत. बदली रोखण्यासाठी, प्रशासनाची कारवाई थांबविण्यासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मदत घेतली. दुसऱ्या खुष्कीच्या मार्गाचा अवलंब करून पदोन्नतीचा लाभ पदरात पाडून घेणारे कर्मचारी यांना आता प्रचार यंत्रणेत सक्रिय करून घेतले आहे. त्यांनाही नाइलाजास्तव डबल ड्युटी करावी लागते आहे. पाच वर्षांतून एकदा असे काम करण्यास काय हरकत आहे, पुढेही अनेकदा या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीची गरज भासणार आहे. अशा मानसिकतेतून महापालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी निवडणूक प्रचाराचे काम करीत आहेत. मतदार यादी तयार करताना कोणाच्या तरी सांगण्यानुसार पैसे घेऊन मतदार यादीत घोळ करणाऱ्या थेरगाव येथील निवडणूक विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. (प्रतिनिधी)आॅन ड्युटी करताहेत ‘डबल ड्युटी’महापालिकेत ड्युटीवर जण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या घरी अथवा कार्यालयात सकाळीच दोन ते तीन तास द्यायचे. नंतर घाईगडबडीत महापालिकेत कामावर जायचे. सायंकाळी सुटी झाल्यानंतर पुन्हा पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात जायचे. दोन वेळ हजेरी लावायची. महापालिकेच्या ड्युटीबरोबर पदाधिकाऱ्याच्या प्रचार यंत्रणेत सहभाग नोंदविण्याची ‘ड्युटी’सुद्धा कर्मचारी करीत आहेत. महापालिका प्रशासन आणि आयुक्त यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.