शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ मिळताहेत भाड्याने?

By admin | Updated: March 20, 2017 04:35 IST

पुष्पमंगल चौक ते अप्परपर्यंत असलेल्या बिबवेवाडी-अप्पर रस्त्यावर भाजी, फळ, हातगाडीवाले यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण

बिबवेवाडी : पुष्पमंगल चौक ते अप्परपर्यंत असलेल्या बिबवेवाडी-अप्पर रस्त्यावर भाजी, फळ, हातगाडीवाले यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काही व्यापाऱ्यांनी तर आपल्या दुकानासमोरील फुटपाथ भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे.या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी फुटपाथदुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांचे लाखो रुपये वाया घातले जातात; मात्र ज्या नागरिकांच्या सोयीसाठी हे फुटपाथ तयार केले आहेत, त्यांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व या भागातील लोकप्रतिनिधींनीदेखील फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या बाजूला नगरसेवक प्रकाश कदम यांनी या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळावी व नागरिकांना योग्यदरात भाजीपाला मिळावा, यासाठी आठवडीबाजार सुरू केला आहे; मात्र तरीही रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळविक्रेते, भाजीविक्रेते, पाणीपुरीवाले यांनी ठिय्या मांडलेला आहे.दरम्यान, या अतिक्रमणांमुळे या भागात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. प्रभाग क्रमांक ३६ व ३७ यांमध्ये हा रस्ता येतो. या प्रभागातील लोकप्रतिनिधी याची गांभीर्याने दखल घेऊन आपली बिबवेवाडी स्मार्ट करण्यासाठी हा रस्ता नागरिकांसाठी खुला करतील, अशी अपेक्षा या भागातील जनता करीत आहे.(वार्ताहर)