शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बंगले भाड्याने दिल्यास गुन्हा दाखल

By admin | Updated: December 24, 2015 00:42 IST

लोणावळा परिसरातील खासगी बंगले भाड्याने दिल्याचे आढळल्यास मालकांवर आयपीसी १८८प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली.

लोणावळा : लोणावळा परिसरातील खासगी बंगले भाड्याने दिल्याचे आढळल्यास मालकांवर आयपीसी १८८प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी दिली. सुटीच्या कालावधीत खासगी बंगले भाड्याने दिले जातात. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात कसलीही माहिती दिली जात नसल्याने मागील काळात रेव्ह, तसेच मद्य पार्ट्यांचे प्रकार घडले आहेत. हॉटेल असोसिएशननेही खासगी बंगल्यांवर कारवाईची मागणी केली असल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.विनायक ढाकणे म्हणाले, ‘‘पुणे शहर व जिल्ह्यातील एक भाग दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ मुंबईपासून जवळ असल्याने येथे कायमच हायअलर्ट असतो. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दहशतवादी कारवाया एका दिवसात होत नाहीत. त्याकरिता प्रथम ठिकाणाची रेकी केली जाते. काही लोक त्या भागात अगोदर काही दिवस राहून जातात. अशा घटना पूर्वी घडल्या आहेत. याकरिता हॉटेलमालकांनी हॉटेलचा तपशिलांसह नकाशा तयार करून पोलीस स्टेशनला द्यायला हवा, जेणेकरून काही घटना घडल्यास आॅपरेशन राबविणे सोपे जाईल.’’ निरीक्षक पाटील म्हणाले, ‘‘हॉटेल मालकांनी हॉटेलचा सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कव्हर करावा. हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व गिऱ्हाइकांच्या ओळखपत्रांची झेरॉक्स २४ ते ३१ डिसेंबरदरम्यान शहर पोलिसांकडे सादर कराव्यात. तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या वाहनांची, तसेच सामानाची तपासणी करण्यासाठी एसएचएमडी हे यंत्र कार्यान्वित करावे. ज्या हॉटेलांमध्ये मनोरंजन कार्यक्रम आहेत, त्यांनी गर्दीत काही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. खासगी बंगले भाड्याने देताना कोणी सापडल्यास आयपीसी १८८प्रमाणे कारवाई करणार आहोत.’’ (वार्ताहर)