शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर येथील दशक्रिया घाटाचे नूतनीकरण

By admin | Updated: April 26, 2017 02:55 IST

श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील दक्षिणवाहिनी चंद्रभागेचे महत्त्व प्राप्त झालेल्या पवित्र मांडवी नदीकिनारी के. टी. बंधाऱ्यालगत

ओतूर : श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथील दक्षिणवाहिनी चंद्रभागेचे महत्त्व प्राप्त झालेल्या पवित्र मांडवी नदीकिनारी के. टी. बंधाऱ्यालगत दशक्रिया घाटाची येथील ७ सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत दशक्रिया घाटाच्या दुरुस्तीची, तसेच नूतनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्यावर्षी मांडवी नदीला आलेल्या पुरामुळे येथील दशक्रिया घाटाची दुरवस्था झाली होती. श्रीक्षेत्र ओतूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या घाटाच्या नूतनीकरणाचा ध्यास घेत वैकुंठधाम परिसर विकास समितीची स्थापना केली.या समितीत चंद्रकांत लक्ष्मण डुंबरे, देविदास बाबूराव तांबे, सरपंच बाळासाहेब पांडुरंग घुले, शेखर वसंतराव डुंबरे, विठ्ठल शितोळे, रत्नाकर (दाजी) धिरडे, वसंतराव डुंबरे यांचा समावेश आहे. यातील चंद्रकांत डुंबरे व बंधू यांनी १ लाख, देविदास तांबे व बंधू बाळासाहेब घुले (सरपंच) विष्णू काळे व समस्त काळे परिवार, रा. ज्ञा. डुंबरे यांच्या वतीने प्रत्येकी ५१ हजार रुपये या परिसर विकासासाठी देणगी दिली. काही जणांनी देणग्या जाहीर केल्या आहेत. या निधीतून या परिसराच्या विकासकामाला सुरुवात झाली आहे. सध्या या ठिकाणी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऊन, वारा व पावसाळ्यात या ठिकाणी विधीसाठी आलेल्या नागरिकांची सोय होणार आहे. या शेडचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या समितीतील सदस्यांनी या स्थळाला चारही बाजूंनी ग्रील बसविले आहे, दशक्रिया विधीसाठीचा ओटा मार्बल टाकून मोठा केला आहे. या कामासाठी समिती सदस्यांनी मदत केली आहे. या समितीचे सदस्य चंद्रकांतशेठ डुंबरे व देविदास तांबे यांनी याच दशक्रिया स्थळाचा परिसर विकासाचा आराखडा सर्व सदस्यांच्या विचाराने केला आहे. (वार्ताहर)