शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

३४ गावांचा प्रश्न निकाली काढा

By admin | Updated: July 9, 2016 03:49 IST

शहरालगत असलेल्या हवेली व मुळशी या तालुक्यांतील ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने

पुणे : शहरालगत असलेल्या हवेली व मुळशी या तालुक्यांतील ३४ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याबाबतचा निर्णय तीन महिन्यांत निकाली काढा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले.३४ गावांतील सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका सादर करण्यात आली आहे. यावर आज सुनावणी झाली. मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात स्थानिक ग्रामपंचायती सक्षम नाहीत. ३४ गावांचा समावेश करण्यास पुणे महापालिका तसेच जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. राज्य शासनानेही मे २०१४मध्ये या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा आदेश काढला आहे. मात्र, अद्याप शासन हा निर्णय घेत नसल्यामुळे हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी २९ जून रोजी सुनावणी झाली होती तेव्हा, ८ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी झाली, तेव्हा सरकारी वकील अ‍ॅड. ठाकूर यांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर पुन्हा ३ वाजता सुनावणी झाली. यात शासनाचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांचे मुदतवाढ मागणीचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यात शासन स्तरावर या प्रकरणी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा निर्णय व्यापक स्वरूपाचा आहे. अनेक तांत्रिक समस्याही उद्भवत आहेत. या सर्व अडचणींचे निराकारण करून आवश्यक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर आणखी कालावधी लागेल. त्यामुळे उच्च न्यायालयाने किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करण्यात आली.यावर न्यायालयाने सदर पत्र रेकॉर्डवर घेऊन तीन महिन्यात अंतिम आदेश देण्याच्या सूचना दिल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संदीप साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनावणीच्या वेळी कृती समितीच्या वतीने कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, राजाभाऊ रायकर, बाळासाहेब हागवणे, संदीप तुपे, मिलिंद पोकळे आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)निवडणूक आयोगाकडे जाऊजिल्हा परिषद निवडणुका आल्या असून, गट-गणांच्या रचनेचे काम शासनस्तरावर सुरू आहे. निकाल लागेपर्यंत ही रचना होईल, याबाबत जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांना विचारले असता, ते म्हणाले, की ३४ गावे वगळण्याचा मी स्वत: जिल्हा परिषदेत ठराव मांडून तो करून घेतला आहे. त्यामुळे जर या ३४ गावांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश करून घेतला, तर निवडणूक आयोगाकडेही आम्ही जाण्याची तयारी करीत आहोत.उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने शासनाला ही ३४ गावे महापालिकेत घ्यावी लागतील. आम्ही त्याचा पाठपुरावा करू, असे कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले.