शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या-ओल्या कच-यांचे विलगीकरण होईना!

By admin | Updated: February 9, 2015 04:00 IST

कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने घरोघरी डस्टबिन वाटप करण्यात आले. मात्र ओेला व सुका कचरा वेगळा करण्याची अंमलबजावणी नागरिकांकडून

पिंपरी : कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने घरोघरी डस्टबिन वाटप करण्यात आले. मात्र ओेला व सुका कचरा वेगळा करण्याची अंमलबजावणी नागरिकांकडून व महापालिकेकडून होताना दिसत नाही. महापालिकेचा कचरा विलगीकरणाचा महत्त्वाचा उद्देशच बाजूला राहिलेला दिसून येत आहे. नागरिक व घंटागाडी कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे ओला व सुका कचरा अजूनही एकत्र जमा होत आहे. शहरातील विविध मोठ्या सोसायट्यांचा कचरा अद्यापही एकत्रच गाड्यांमध्ये टाकला जात आहे. कचरा वेगळा करण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही. महापालिकेने कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन वाटपावर लाखो रुपये अद्यापपर्यंत खर्च केलेले आहेत.सोसायट्यामध्ये कचरा वर्गीकरणाविषयी कोणतीही अंमलबजावणी नाही. सोसायटी धारकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सोसायटी धारक कचरा टाकताना एकत्रितच कचरा टाकत आहेत. दोन डस्टबिनचा उपयोग काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे कचरा वर्गीकरणासाठी पालिकेला घनकचरा नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने शहरात २ लाख ७७ हजार ९६६ कुटुंबांना डस्टबिन वाटप झालेले आहे. कर्मचाऱ्यांकडन ४ लाख ८६ हजार ९३२ डस्टबिन बकेट आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या आहेत. ९ लाख ५७ हजार ६९६ अशा हिरव्या व पांढऱ्या रंगाच्या डस्टबिन मंजूर झालेल्या आहेत. या डस्टबिन ७ लीटर क्षमतेच्या आहेत. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुर्नर्निमाण योजनेच्या माध्यमातून डस्टबिन वाटप केले आहे. या अंतर्गत ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येणार आहे. याकरिता ६ कोटी ७९ लाख ६४६ हजारांचा निधी उपलब्ध झालेला आहे. याकरिता १ हजार ८८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र डस्टबिन वाटपाचे ४७ टक्के काम महापालिकेच्या वतीने पूर्ण झालेले आहे. डस्टबिन वाटपाचे अर्धे काम शिल्लक आहे. डस्टबिन वाटपात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कचरा विलगीकरणासाठी ३०२ टाटा एस ला रंग देऊन वाहतूक व्यवस्था केली आहे.(प्रतिनिधी)