शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३८ वर्षांनंतर दिला आठवणींना उजाळा

By admin | Updated: July 8, 2017 01:51 IST

वयाच्या ६व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर माझा सांभाळ आईने केला तसेच माझी जडणघडण शाळेतील शिक्षकांमुळे झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपौड : वयाच्या ६व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर माझा सांभाळ आईने केला तसेच माझी जडणघडण शाळेतील शिक्षकांमुळे झाली. शाळेमुळेच मी घडलो, असे मत प्रसिद्ध उद्योजक विलास चोरगे यांनी तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पिरंगुट इंग्लिश स्कूल या शाळेच्या १९७८-७९ मधील १०वीच्या तुकडीचे विद्यार्थी तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र आले. तत्कालीन शिक्षक, वर्गमित्र व शाळेच्या आठवणींना या माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या शाळेच्या १९७८-७९मधील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून माजी विद्यार्थी मेळावा व गुरुजन सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाचे सचिव अनिल गुंजाळ हे प्रमुख अतिथी तसेच खजिनदार मोहनराव देशमुख उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून हेमंत पांडे, प्रसिद्ध उद्योजक विलास चोरगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हेमंत पांडे यांनी शिक्षकांना देण्यात आलेल्या सन्मानचिन्हांच्या मानपत्राचे वाचन केले. माजी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ व वयोवृद्ध शिक्षकांनी आपल्या मनोगतातून मागील ३८ वर्षांपूर्वीच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन मुख्याध्यापक निकम, सहशिक्षक शाबुद्दिन, वाळुंज, गुंजाळ, वडेर, नागरे, जाधव, चव्हाण या शिक्षकांनी अनेक आठवणी उजाळा दिला. शहाबुद्दीन यांनी माजी विद्यार्थ्यांनी सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले. या तुकडीला शिकविणारे तत्कालीन शिक्षक व या तुकडीतील विद्यार्थी मागील काही वर्षांत काळाच्या पडद्याआड गेले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या तत्कालीन शिक्षकांचा सत्कार केला. तसेच शाळेत या वर्षी १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचाही रोख पारितोषिके देऊन माजी विद्यार्थ्यांनी सन्मानित केले. स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी विलास चोरगे, हेमंत पांडे, एम. ए. जाधव, बाळासाहेब गोळे, अशोक कोरडे, अविनाश धनलोभे आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच, माजी विद्यार्थ्यांनी ३८ वर्षांनंतर आपली संस्था, शाळा व शिक्षकांची आठवण ठेवून हा मेळावा घेतल्याबद्दल अभिनंदन केले. संतोष गावडे यांनी सूत्रसंचालन केले.