शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीच्या खुनाचे गूढ उकलले

By admin | Updated: February 16, 2017 03:26 IST

मेहुण्याने केलेल्या दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या तसेच वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या मेव्हणीचा

पुणे : मेहुण्याने केलेल्या दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या तसेच वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या मेव्हणीचा थंड डोक्याने केलेला खून स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून केल्यावर चाकणला पुरलेला मृतदेह परत उकरून काढत बार्शी तालुक्यातील एका शेतामध्ये जाळण्यात आला. जळालेल्या मृतदेहाची शिल्लक राहिलेली हाडे आणि कवटीसुद्धा आरोपींनी दगडाने ठेचून भुगा करून नष्ट केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांनी दिली. अश्विनी शिवकुमार परदेशी (वय २५, रा. गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी गोविंद ताकभाते (रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी ही ५ जानेवारी रोजी मिसिंग झाली होती. याबाबत तिची आई राजश्री यांनी फिर्याद दिली होती. अश्विनीचे नदीम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पोलिसांनी ती त्याच्यासोबत पळून गेल्याचा संशय व्यक्त करीत त्याच्याकडे चौकशी केली. परंतु, अश्विनीच्या संमतीनेच त्याचे दोन महिन्यांपूर्वी त्याच्याच धर्मातील एका तरुणीसोबत आईवडिलांनी लग्न लावून दिल्याचे समोर आले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांना वेगळीच शंका आली. त्यांनी अश्विनीची बहीण स्वाती हिच्याकडे महिला उपनिरीक्षक क्षीरसागर, पोलीस शिपाई श्रद्धा अकोलकर यांच्या मदतीने चौकशी सुरू केली. स्वाती हिचे गोविंदसोबत आळंदीमध्ये लग्न झाले होते. गोविंदच्या आईला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तो सहा महिन्यांमधून कधीतरी येऊन स्वातीजवळ राहायचा. त्यांना दोन मुले आहेत. (प्रतिनिधी)