पॉझिटिव्हीटी दर (आजचा) : २२ टक्के
पॉझिटिव्हीटी दर (आजवरचा) : १८.७
४०७७ रुग्णांची वाढ : ३,२४० रुग्ण झाले बरे, तर ३६ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असली, तरी मागील आठवड्याभरातील रुग्णवाढ सोमवारी कमी झाली. सोमवारी दिवसभरात ४ हजार ७७ रुग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ३ हजार २४० रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ९१९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४२ हजार ७४१ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९१९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ३ हजार ९५२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ४८८ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ३ हजार २४० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ८९२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ९४ हजार १२१ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४२ हजार ७४१ झाली आहे.
---
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १८ हजार ७२० नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १५ लाख ७६ हजार ३४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.