शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेपोटी पकडलेल्या खवले मांजराची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST

खवले मांजराच्या विक्रीवर बंदी आहे. अंधश्रद्धेपोटी गेल्या काही वर्षांत खवले मांजर बाळगले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परदेशात तस्करी करून ...

खवले मांजराच्या विक्रीवर बंदी आहे. अंधश्रद्धेपोटी गेल्या काही वर्षांत खवले मांजर बाळगले जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परदेशात तस्करी करून खवले मांजर विक्रीस पाठविले जाते. पुणे-नाशिक रस्त्यावर असलेल्या संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात खवले मांजराची विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती वनविभागाच्या पुणे कार्यालयातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तेथे सापळा लावून महेंद्र मच्छिंद्र केदार (वय २५), सागर भीमाजी डोके (वय २५, दोघे रा. साकूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशोक दादा वारे (वय २९, रा. तहराबाद, ता. राहुरी, जि. अहमदनगर), अनिला धोंडिबा भालेकर (वय ६१, रा. विठ्ठलवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील पाटण खो-यामध्ये असणा-या साकेरी येथील वनखंड १३४ येथून खवले मांजराची तस्करी करण्यात आली होती. सदर आरोपींनी हे खवले मांजर विक्रीसाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे आणणार असल्याची खबर मिळताच वनविभागाच्या पथकाने छापा टाकून आरोपींसह जिवंत खवले मांजर पकडले.

यानंतर हे खवले मांजर बाराज्योतीर्लिंगापैकी एक असणा-या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील अभयारण्यामध्ये सोडण्यात आले.

अंधश्रद्धेपोटी पकडलेल्या खवले मांजराची सुटका वनविभागाने करून पुन्हा श्री क्षेत्र भीमाशंकर येथील अभारण्याच्या निसर्ग सहवासात सोडण्यात आले.