शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘यशवंत’ची जमीन मुक्त करा!

By admin | Updated: April 25, 2016 02:40 IST

गेली चार वर्षे राजकारण्यांनी दिलेल्या आश्वासनांवर यशवंत साखर कारखाना सुरू न झाल्याने अखेर कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मुलांनी तो सुरू करण्यासाठी एल्गार पुकारला आहे.

लोणी काळभोर : गेली चार वर्षे राजकारण्यांनी दिलेल्या आश्वासनांवर यशवंत साखर कारखाना सुरू न झाल्याने अखेर कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मुलांनी तो सुरू करण्यासाठी एल्गार पुकारला आहे. रविवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात ‘यशवंत’ची जमीन मुक्त करावी यांसह पाच महत्त्वाचे ठराव करण्यात आले. यशवंत चालू करावयाचा, या निर्धाराने कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी ‘मी यशवंत बोलतोय...’ असे भावनिक आवाहन करून ‘यशवंत बचाव कृती समिती’ स्थापन केली आहे. यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. परंतु राजकीय जोडे बाजूला ठेवून यशवंत कारखाना हाच एक पक्ष मानून सभासदांच्या तरुण मुलांनी पक्षविरहित काम करण्याचे ठरवले आहे. या कृती समितीशी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. गावातील, पक्षातील किंवा इतर कुठल्याही प्रकारची गटबाजी न करता समिती काम करणार आहे. यशवंत कार्यक्षेत्रांतील बहुतांश गावांमध्ये जनजागृती करून या तरुणांनी रविवारी थेऊर येथे कारखाना आवारांत दशरथ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा घेतला.उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्वपक्षीय मान्यवरांनी यशवंतप्रश्नी मार्ग काढण्यात सर्व राजकीय पक्षाचे धोरण चुकलेले असल्याने कारखाना गेली चार वर्षे बंद असल्याचे मान्य केले. यापुढे मात्र यापूर्वी झालेल्या सर्व बाबींना पूर्णविराम देऊन फक्त यशवंत सुरू होण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावयाचे, असे सांगितले.मेळाव्यास माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वसंत कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यशवंत सुरू करण्याबाबत यांपुढील आवश्यक ते सर्व निर्णय घेण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांची कमिटी स्थापन करण्यात आली. लक्ष्मण भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)