शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नीरा नदीत धरणाचे पाणी सोडा

By admin | Updated: May 8, 2017 01:58 IST

भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्याचबरोबर नीरा नदीत धरणाचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडापुरी : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्याचबरोबर नीरा नदीत धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यांच्यासमवेत वडापुरी अवसरी सुरवड येथील शिष्टमंडळ होते. मागण्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, हनुमंत जगताप, महादेव तावरे, केशव सुर्वे, दादा जगताप, सुखदेव निकम, दत्तात्रय सवासे, ज्ञानदेव फडतरे, राजकुमार बर्गे, लक्ष्मण सरडेसह शेतकरी उपस्थित होते. भाटनिमगावचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा २००५ मध्ये बांधण्यात आला. मात्र बंधारा नदीपात्राच्या खोलीपेक्षा १ मीटर खोल आहे. त्यामुळे त्यामध्ये पाणी थांबत नाही. बंधाऱ्याचे ढापे निकृष्ट दर्जाचे आहेत. बंधाऱ्याचे काम ज्या वर्षात पूर्ण झाले तेव्हाच पाणी साठले. त्यानंतर पाणी साठले नाही. बंधाऱ्याचा वापर रहदारीसाठी केला जातो. या बंधाऱ्यांवर तीन पाणीवाटप संस्था अवलंबून आहेत. पाणीच साठत नसल्याने शेतकरी सभासददेखील अडचणीत आले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या बंधाऱ्याचा बाभूळगाव, भाटनिमगाव, बेडशिंग, अवसरी, वडापुरी, सुरवड अशा आठ गावांना फायदा होणार आहे. या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तरंगवाडी  तलावात पाणी सोडल्याबद्दल अधिकाऱ्यांचे आभार मानले. या  वेळी वडापुरी, सुरवड, अवसरी या भागातील शेतकरी उपस्थित होते.