शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलचे लेखा परीक्षण ‘सारथी’वर प्रसिद्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2015 05:01 IST

घरकुल प्रकल्पाचे मनपाच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण ‘सारथी’ या प्रणालीवर प्रसिद्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.

पिंपरी : जेएनएनयूआरएम अंतर्गत असलेल्या घरकुल प्रकल्पाचे मनपाच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण ‘सारथी’ या प्रणालीवर प्रसिद्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) राबविण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पात बेकायदेशीरपणा व नियमबाह्यता झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांकडून मनपाचे साप्ताहिक लेखापरीक्षण होते. याबाबत वेळोवेळी स्थायी समितीलाही कळविले जाते. आढळून आलेली नियमबाह्यता व अयोग्यता यांविषयी स्थायी समितीला अहवाल दिला जातो. या सर्व बाबी महापालिकेसमोर ठेवण्यात येतात. परंतु, आजपर्यंत मनपा मुख्य लेखापरीक्षकांकडून घरकुल प्रकल्पाचे केलेले लेखापरीक्षण हे महापालिकेसमोर ठेवण्यात आलेले नाही. घरकुल प्रकल्पात बेकायदेशीरपणा, नियमबाह्य गैरप्रकार असल्याचे निदर्शनास आले असून, केंद्र शासन राज्य शासन व मनपा यांचा एकत्रित शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तसेच ५१ कोटी रुपयांचा वाढीव खर्चही झाला आहे. घरकुलबाबतची स्थिती सर्वसामान्यांना समजणे गरजेचे आहे. यासाठी त्याचे लेखापरीक्षण सारर्थी प्रणालीवर प्रसिद्ध करावे. (प्रतिनिधी)