शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे सुरूच

By admin | Updated: March 28, 2016 03:26 IST

रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारींची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा वाढली आहे. बाहेरगावाहून रात्री उशिरा येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक करून

पुणे : रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारींची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा वाढली आहे. बाहेरगावाहून रात्री उशिरा येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक करून जास्तीचे भाडे मागणे, जवळच्या ठिकाणी येण्यास नकार देणे अशा प्रकारांमुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत.प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व वाहतूक पोलिसांच्या वतीने भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडल्यानंतर रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी साध्या वेशातील महिला पोलीस पाठवून भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली होती. मात्र पुन्हा भाडे नाकारण्याचे प्रकार वाढले आहेत.सकाळच्या वेळी किंवा रिक्षांची उपलब्धता कमी असताना रिक्षाचालकांकडून हमखास अडवणूक केली जाते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना तर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. बाहेरगावच्या लोकांकडून जास्तीचे भाडे मागून त्यांची अडवणूक केली जाते अशी तक्रार अनिकेत राठी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे केली आहे. रिक्षा संघटनांनीही यासाठी पुढाकार घेण्याची मागणी राठी यांनी केली आहे. रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून दमदाटीची भाषा वापरली जाते असे अनंत ढगे यांनी सांगितले. शिवाजीनगर, स्वारगेट, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी रिक्षाचालक घोळक्याने थांबलेले असतात, वाटेल तेवढे भाडे त्यांच्याकडून मागितले जाते. रात्रीच्या वेळेस अडवणुकीचे प्रकार जास्त होतात. यावर मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी प्रिपेड केंद्र सुरू करण्यात आले होते; मात्र रेल्वे स्टेशन वगळता इतर ठिकाणचे प्रिपेड केंद्र बंद पडलेले आहे. टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध हवाआरटीओच्या १८००२३००१२ या टोल फ्री क्रमांकावर रिक्षाचालकांबाबत तक्रारी करता येतात. मात्र हा टोल फ्री क्रमांक केवळ कार्यालयीन वेळेतच सुरू असतो. त्यामुळे कार्यालयीन वेळे- व्यतिरिक्त अडचण आल्यास तक्रार नोंदविता येत नाही. त्यामुळे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध असावा, अशी मागणी नीलेश महाजन यांनी केली आहे.ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावीरिक्षाचालकांनी भाडे नाकारले, गैरवर्तन केले तर mh12@mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रार करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे. ई-मेल मध्ये रिक्षाचा क्रमांक, घटना घडली ती तारीख, वेळ, ठिकाण व्यवस्थित नमूद करावी. ई-मेलवर लेखी तक्रार आल्यास कारवाई करणे अधिक सोयीस्कर ठरते असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांशी चर्चा करून याविरुद्ध आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या वतीने संयुक्त मोहीम उघडली जाईल, असे त्यांनी सांगितले.