शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्ह्यातच पुनर्वसन

By admin | Updated: December 17, 2014 05:37 IST

गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्हे तालुक्यातच पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन झाल्यास गुजवणी धरणात पा

पुणे: गुंजवणी प्रकल्पग्रस्तांचे वेल्हे तालुक्यातच पुनर्वसन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन झाल्यास गुजवणी धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, यामुळे पुरंदरचा पाण्याचा प्रश्नदेखील सुटण्यास मदत होणार आहे.पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरणारे गुंजवणी धरण बांधून चार वर्षे पूर्ण झाले तरी अद्याप धरणांमध्ये पाणी साठविण्यात आलेले नाही. धरणांमध्ये पाणी साठविल्यास पाण्याच्या फुगावड्यामुळे काही घरे पाण्याखाली येतात. यामुळे प्रथम या लोकांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने येथील सुमारे ८५ प्रकल्पग्रस्तांना शिरुर आणि दौंड तालुक्यात जमिनी देऊ केल्या आहेत, पण प्रकल्पग्रस्तांनी या जमिनी घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी वेल्हे तालुक्यातच आपले पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात येथील ८५ प्रकल्पग्रस्तांना गुंजवणी धरणाच्या खालील बाजूस घरांसाठी प्लॉट देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रकल्पा पासून आठ किलोमीटरमध्ये शेतीसाठीची जमीन देण्यात येणार आहे. या लोकांचे पुनर्वसन झाल्यास धरणांमध्ये पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, धरणामध्ये तीन टीएमसी पाणी साठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.धरणातील कालव्यामुळे वेल्हे तालुक्यातील १८ गावातील १३०२ हेक्टर व भोर तालुक्यातील ३७ गावातील १३८७५ हेक्टर अशी १५ हजार १७७ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. वेल्हे तालुक्यातील १८ गावांना तर भोर तालुक्यातील ३७ गावांना लाभीमळणार आहे. . मात्र कालव्याची कामे कधी पुर्ण होणार आणि लोकांना पाणी कधी मिळणार. (प्रतिनिधी)