शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाणीपुरवठा विभागाने आशानगर येथे २० लाख लिटरची पाणी बांधली आहे. परंतु, त्या टाकीला मुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पाणीपुरवठा विभागाने आशानगर येथे २० लाख लिटरची पाणी बांधली आहे. परंतु, त्या टाकीला मुख्य पाईपलाईनमधून रस्तेखोदाईचे अडचण असल्याचे सांगून पाणी पोहचविले जात नाही. महापालिकेचे हे उत्तर न पटणारे आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील डेक्कन, चतु:श्रृंगी मंदिर परिसर, पांडवनगर, औंध भागात लवकरात लवकर कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नीलेश निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे़

याबाबत अ‍ॅड. निकम व राजू साने यांनी आयुक्तांची भेट घेऊन या भागातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अ‍ॅड. निकम यांनी सांगितले की, गोखलेनगर, जनवाडी, निलज्योती, आशानगर, वैदुवाडी, श्रमिक नगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, बहिरट नगर, चतुश्रृंगी मंदिर परिसर हा भाग उंचावर वसल्याने या भागास कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यामुळे येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता आशानगरमध्ये २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली़

मात्र या टाकीला एस. एन. डी. टी येणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून सेनापती रस्त्यावर रस्ता खोदाईची अडचण असल्याचे अजब कारण महापालिकेकडूनच सांगण्यात येत आहे. रस्ते खोदाईला इतरांना परवानगी देणाऱ्या महापालिकेला येथे रस्ता खोदण्यास कोणती अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित करून अ‍ॅड. निकम यांनी साडेचार वर्षांपासून बंद ठेवलेले काम लवकर सुरू करावे. अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याशिवाय आमच्या समोर पर्याय नसल्याचे सांगितले आहे.