शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० टक्के अनुदान हवे

By admin | Updated: July 7, 2017 03:01 IST

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत अनेक त्रुटी आहेत. त्या भरून न काढल्यास अनेक शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत अनेक त्रुटी आहेत. त्या भरून न काढल्यास अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त करून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान  दिले पाहिजे, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे  येथील शेतकऱ्यांनी माजी केंद्र्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करताना केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी  बोलून त्रुटी दूर करव्यात, असेही त्यांनी सांगितले.  पुणतांबे येथील किसान क्रांती जनआंदोलनाच्या शेतकरी प्रतिनिधींनी शरद पवार यांची माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात अभय चव्हाण, अमोल टेके, संभाजी डोके, पाराजी वरकडे, बाळासाहेब वाणी, मधुुकर पेटकर, सचिन ढोरडे, विलास पेटकर आदींचा समावेश होता. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. अनेक निकषांमुळे शेतकरी कर्जमाफीच्या धोरणावर समाधानी नसल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले. कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये सन २०१२ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही. सन २०१२ ते १६ या कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देऊ केली आहे हे जरी खरी असले, तरी ३० जून २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीत थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांना मात्र या कर्जमाफीत स्थान नाही. दीड लाख रुपयांपेक्षा अधिक मुद्दल आणि व्याज असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी पैसे भरण्याची मुभा दिली आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बॅँका, नाबार्ड, रिझर्व्ह बॅँकेच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे बॅँकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज शेतकरी शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफीच्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलन यशस्वी झाले आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या धोरणात राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी मदत केली जाईल, असे शरद पवार यांनी या शेतकरी शिष्टमंडळाला सांगितले.शेतकरी कुटुंबनिहाय कर्जमाफीचे धोरणदेखील त्रासदायक आहे. ग्रामीण भागात आजही संयुक्त कुटुंबपद्धती आहे. त्यामुळे खातेदारनिहाय कर्जमाफी देण्याची गरज असल्याचे या शिष्टमंडळाने या वेळी निदर्शनास आणून दिले.