पुणे: पुणे बार असोसिएशनच्या आजीव सभासदत्वासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत सभासदत्वासाठी सुमारे १००० वकिलांनी अर्ज घेतल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक आणि सचिव ॲड. विकास बाबर यांनी दिली.
वकिलांनी अधिकाधिक संख्येने पुणे बार असोसिएशनचे आजीव सभासदत्त्व घ्यावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे केले आहे.
असोसिएशनच्या ११ मार्च २०२०२ जी झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव मंजूर केला. मात्र, करोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे याची अंमलबजावणी करण्यास सुमारे ११ महिन्याचा विलंब झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुणे बार असोसिएशन ही संस्था पुणे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. घटनेमध्ये असोसिएशनच्या आजीव सभासदत्वाची तरतूद आहे. त्याची नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. सभासदत्व होऊ इच्छिणाऱ्या वकिलांनी दोन हजार रक्कम रुपये भरून सभासदत्त्व घ्यायचे आहे. त्याकरिता बार कार्यकारिणीने शिवाजीनगर न्यायालय आवारातील स्टेट ंबॅंक ऑफ इंडियाचे शाखेमध्ये पुणे बार असोसिएशनचे चालू खाते उघडले आहे. त्यास बॅंकेकडून क्यूआर कोडही प्राप्त झालेला आहे. पुणे बार असोसिएशचे सभासद होण्यासाठी वकिलांना ११ सकाळी ते सांयकाळी ५ या वेळेत बारच्या ऑफिसमध्ये फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
.....