शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’अतंर्गत राज्यात ८५०० प्रकल्पांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:10 IST

शासनाच्या ‘महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी’ (रेरा) कायद्यांतर्गत बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै अखेरची मुदत होती.

पुणे : शासनाच्या ‘महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी’ (रेरा) कायद्यांतर्गत बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै अखेरची मुदत होती. गेल्या तीन महिन्यांत राज्यात सुमारे ८ हजार ५०० प्रकल्पांच्या नोंदणीसाठी रेरा प्राधिकरणाकडे अर्ज केले आहेत. अद्यापही राज्यातील हजारो प्रकल्पांची नोंद झालेली नाही. यामुळे शासनाने ‘रेरा’अंतर्गत नोंद करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ‘क्रेडाई’ च्या वतीने करण्यात आली आहे.बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यातंर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी स्वतंत्र कायदा तयार केला. महाराष्ट्र शासनाने १ मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ३० एप्रिल २०१७ अखेरपर्यंत भोगवटापत्र न मिळालेल्या व सध्या बांधकाम सुरु असलेल्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांची ३१ जुलैपर्यंत नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांची नोंदणी न केल्यास बांधकाम व्यावसायिकांना त्या प्रकल्पांच्या सदनिकांच्या विक्री व्यवहारांवर पूर्णपणे बंदी आहे. तसेच अशा प्रकल्पाची जाहिरात करणे, मार्केटिंग करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशी नोंदणी न केल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पाच्या किमतीच्या पाच ते दहा टक्के दंड आकारला जाऊ शकतो.रेरा अंतर्गत प्रकल्पाची नोंदणी करताना नोंदणी केलेल्या प्रकल्पातील प्रत्येक फ्लॅटचे चटई क्षेत्र किती असेल, खरेदीखत कसे करणार, सोसयटी किती दिवसांत स्थापन करणार आदी अनेक लहान-मोठ्या गोष्टींची सुस्पष्ट माहिती नोंदणी करताना द्यावी लागत आहे. तसेच नोंदणी करताना ठरवून दिलेल्या वेळेतच प्रकल्प पूर्ण करावालागणार आहे. याशिवाय देखील अनेक किचकट अटी लादण्यात आल्या आहेत. त्यात हा अर्ज आॅनलाइन भरावा लागत आहे. राज्यात अद्यापही अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या मर्यादा येत आहेत. नोंदणी करताना बांधकाम व्यावसायिकांना अनेक गोष्टी सीएकडून तपासणी करून द्याव्या लागत आहे. त्यात सुरुवातीला नोंदणी केल्यानंतर पुन्हा काहीही बदल करण्याची सुविधा नसल्याने अनेक प्रकल्पांची नोंदणी झाली नव्हती.अखेर तीन दिवसांपूर्वी रेरा प्राधिकरणाने अर्ज भरताना एखादी चुक दुरुस्त करण्याची संधी दिली आहे. यामुळे अखेरच्या दोनदिवसांत रेराअंतर्गत नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले. सोमवारी (३१ जुलै) सायंकाळीपर्यंत ८ हजार ५०० प्रकल्प आणि साडेनऊ हजार रिअल इस्टेट एजंट यांनी नोंदणी केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.