शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कारभार चव्हाट्यावर

By admin | Updated: July 16, 2017 03:30 IST

बारामती नगरपालिकेच्या डुक्कर पकडण्याचे कामाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे तसेच नगरपालिका निवडणूक काळातील खर्चाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती नगरपालिकेच्या डुक्कर पकडण्याचे कामाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे तसेच नगरपालिका निवडणूक काळातील खर्चाच्या बाबतीत चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीष बापट यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रय लांघी यांनी बारामतीचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. बारामती नगरपालिकेच्या कारभाराची यापूर्वी देखील तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या आदेशाने तत्कालीन उपजिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी चौकशी केली करून राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन प्रांताधिकारी नंदकुमार काटकर यांनी देखील चौकशी करून राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. या दोन्ही चौकशीनंतर देखील कारभारात बदल झाला नाही. उलट बारामती नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर रस्ते, भूमिगत गटारांसह अन्य कामे मनमानी पद्धतीने केली आहेत. त्यावर देखील अनेकदा गदारोळ झाला. याबाबत देखील तक्रारी झाल्या आहेत. त्यावर देखील कारवाई केली नाही. याच पार्श्वभूमीवर ऐन निवडणूकीच्या काळात २ लाख ४९ हजार ४०० रूपये खर्च करून जयशंकर या ठेकेदारामार्फत ५८० डुकरे पकडल्याचे बील अदा करण्यात आले. याची पोलखोल विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील सस्ते, नगरसेवक विष्णूपंत चौधर आणि जयसिंग देशमुख यांनी केली. त्याच बरोबर नगरपालिका निवडणूक काळात व्हीडीओ चित्रीकरण, मंडप, जेवन खर्चाचे भरमसाठ बील काढण्यात आले आहे. त्यासाठी ई टेडरींग चा वापर केला नाही. चित्रीकरणाच्या सीडी पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे. याच अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. बारामती शहरातील ५८० डुकरे पकडून नगरच्या घाटात सोडल्याचा दावा जयशंकर मजूर संस्थेच्या च्या ठेकेदाराने केला आहे. वास्तविक बारामती ते नगर पर्यंत एकही घाट नाही. डुकरे मालकी हक्काची असतात. ज्या भागात डुकरे पडकल्याचा दावा केला आहे. तेथील नागरीकांना कोणतीही माहिती नाही. नगरपालिका निवडणूक खर्चाच्या बाबतीत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. १९ प्रभागात ८०० कॅमेरामनचा वापर केला असे बिल अदा करताना नमूद केले आहे. बिल अदा करताना ३ लाखांच्या आतील ५ देयके दाखल करून १२ लाख ४४ हजार रूपये ठेकेदाराला अदा केले आहे. मंडप उभारणीसाठी ५ लाख ५३ हजार ५३० खर्च दाखवला. छपाईसाठी ४ लाख १७ हजार खर्च दाखवला आहे. केटरिंगचा खर्च २ लाख ८६ हजार झाल्याचे नमूद केले आहे. हा खर्च अवास्तव आहेच. त्याचबरोबर नियमबाह्य असल्याची तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर सूत्रे हलली. या आदेशामुळे बारामती नगरपालिकाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या दोन्ही गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.