शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माहितीपुस्तिका व अर्जासाठीचे शुल्क परत करा

By admin | Updated: June 25, 2017 05:04 IST

प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना असतानाही काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरूच असल्याच्या तक्रारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना असे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये, तसेच शुल्क घेतले असल्यास ते परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची धावपळ सुरू आहे. काही महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहेत, तर काही महाविद्यालयांमध्ये लेखी स्वरूपात अर्ज भरले जात आहेत. या प्रक्रियेमध्ये काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी शुल्क आकारले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये हे शुल्क वेगवेगळे आहे. याबाबत विद्यापीठाकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वी असे शुल्क न आकारण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना दिल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत काही महाविद्यालयांनी शुल्क आकारणी सुरूच ठेवली असल्याच्या तक्रारी पुन्हा येऊ लागल्या आहेत.याची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिकेसाठी शुल्क न आकारण्याच्या सूचना पुन्हा दिल्या आहेत. तसेच घेतलेल्या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना तातडीने परत करावी, असेही त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठाने प्रवेश अर्जासाठी कोणतेही शुल्क निश्चित केलेले नाही. माहितीपुस्तिकेसाठी आकारायच्या शुल्काचा समावेश प्रवेशानंतर आकारण्यात येणाऱ्या स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी शुल्कात समावेश करण्यात आलेला आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.