शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध माती वाहतूक व उत्खननाला ऊत

By admin | Updated: April 20, 2015 04:19 IST

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावातून व वाड्या-वस्त्यांमधून अवैधरीत्या माती वाहतूक व उत्खनन जोमात चालू असून,

मढ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावातून व वाड्या-वस्त्यांमधून अवैधरीत्या माती वाहतूक व उत्खनन जोमात चालू असून, या सर्व प्रकारास महसूल अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा या परिसरात आहे.या परिसरात मढ खोऱ्यातील तळेरान, खिलेश्वर, कोल्हेवाडी, गवारवाडी, सीतेवाडी तसेच डोंगरीभागातून माती अवैधरीत्या नियम धाब्यावर बसवून काढली जाते व अवैधरीत्याच वाहतूक केली जाते. या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.मुळात तालुक्याचा हा पिंपळगावजोगा धरण परिसर तसेच माळशेज पट्टा इको-झोनमध्ये असल्याने येथे उत्खनन करण्यास बंदी आहे. तरीही या परिसरात जेसीबी यंत्राच्या साह्याने उत्खनन सर्रास चालू आहे. अवैध गौण खनिजाच्या लुटीमुळे मढ खोऱ्यातील आदिवासी गावातील परिसरात असलेले डोंगर, टेकड्या, जंगले, झाडेझुडपे, नामशेष होऊ लागली आहेत. संबंधित शासकीय विभागातील काही अधिकारी आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैध उत्खनन व वाहतुकीकडे काणाडोळा करीत आहे. या परिसरातून जुन्नर, बनकरफाटा, ओतूर मार्गाने सर्रास चालू आहे, तर काही माती माफिया तुटपुंजी रॉयलटी भरून, वाहतूक परवाने काढून राजरोसपणे माती मढ खोऱ्यातील आदिवासी पट्ट्यातील गावामधून व वाड्या-वस्त्यांमधून सर्रास नेत आहे.