शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीसाठी पदपथाची रूंदी कमी करणार

By admin | Updated: June 17, 2014 03:04 IST

बीआरटी प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्यातील त्रुटींबद्दल चर्चा होऊ लागली आहे.

पिंपरी : बीआरटी प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्यातील त्रुटींबद्दल चर्चा होऊ लागली आहे. ग्रेड सेपरेटर, तसेच बाजूचा बसमार्ग, बसमार्गालगतचा अरुंद झालेला रस्ता ही परिस्थिती वाहतूक सुलभीकरणास उपयुक्त ठरण्याऐवजी अपघातास निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होऊ लागल्याने पदपथांची रुंदी कमी करून दोन्ही बाजूने रस्ता रुंदीकरण करण्याचा पर्याय निवडला आहे, असे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले.बीआरटी प्रकल्प, ग्रेड सेपरेटर प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणून देणारे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. पुणे -मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड हद्दीत महापालिकेने राबविलेले दोन्ही प्रकल्प वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडविण्यास कसे कारणीभूत ठरतात, ही वस्तुस्थिती ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिली होती. तांत्रिकदृष्ट्या झालेल्या चुका सुधारण्याची आवश्यकता असल्याची नागरिकांची मते नोंदवली होती. त्याची आयुक्तांनी दखल घेतली असून, उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे. सध्या बीआरटी मार्गावर बसथांबे उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीस अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्त जाधव यांनी त्यात आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात बीआरटी मार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते दापोडीपर्यंत दोन्ही बाजूंना आणखी एक लेन तयार करण्याचे विचाराधीन आहे. युद्धपातळीवर ते काम केले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले पदपथ वापरात येत नाहीत. रस्त्याकडेचे दुकानदार या पदपथांचा वापर करतात. पदपथांची रुंदी कमी करून रस्ता रुंदीकरणाचा पर्याय आहे. आयआयटी, पवई संस्थेने सुचविलेल्या सुधारणा केल्या जातील. बीआरटी मार्गावर सर्व्हिस लेनलगत सायकल ट्रॅक, पदपथ प्रस्तावित आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)