शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ परवान्याचा कालावधी कमी करा

By admin | Updated: February 20, 2016 00:48 IST

परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता अर्जदारांना एक ते दोन महिने तर काही कार्यालयांमध्ये तीन ते चार महिने कालावधी लागत आहे.

पिंपरी : परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता अर्जदारांना एक ते दोन महिने तर काही कार्यालयांमध्ये तीन ते चार महिने कालावधी लागत आहे. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, प्रमुखांनी दरमहा शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी अपॉइंटमेंट प्रक्रियेचा आढावा परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेही गरजेचे होते, असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पाठविण्यात आले आहे. शिकाऊ व पक्का परवाना काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जदारांना दोन ते तीन महिने वेळ लागत आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाने आॅनलाइन सुविधा सुरू केली आहे. मात्र, अनेक दिवस पाठपुरावा घेऊनसुद्धा अर्जदारांना आरटीओचे संकेतस्थळ प्रतिसाद देत नाही. संकेतस्थळ उघडले, तर अर्ज भरेपर्यंत बंद होते. अशा अनेक अडचणी अर्जदारांना येत आहेत. यामार्फत अपॉइंटमेंट मिळाली, तरी आरटीओत चाचणीसाठी वेळ लागतो. अर्जदारांची रांगच्या रांग आरटीओत पाहायला मिळतात. आरटीओच्या फेऱ्या मारून संबंधित हैराण झाले आहेत.कार्यालय प्रमुखाने उमेदवारांना शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता अपॉइंटमेंट मिळण्यास किती कालावधी लागतो, याचा तत्काळ व दरमहा आढावा पाठविण्यास यावा, असे निर्देश आरटीओ कार्यालयाला दिली आहेत. ज्या कार्यालयामध्ये अपॉइंटमेंटसाठी १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल, त्या कार्यालयाच्या प्रमुखांना सूचना देण्यात आली आहे की, शिकाऊ व पक्का परवाना चाचणीकरिता ठरवून दिलेला कोटा व दैनंदिन गैरहजर राहणाऱ्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता त्यानुसार कोट्यामध्ये वाढ करण्यात यावी. गैरहजर राहिलेल्या उमेदवारांच्या ऐवजी पुढील दिनांकाच्या अपॉइंटमेंट मिळालेल्या उमेदवारांना स्वीकारु नये. ज्या उमेदवारांना पुढील तारखेची अपॉइंटमेंट मिळाली असेल व शिकाऊ परवाना मुदत सुरू आठवड्यात संपत असेल, त्या उमेदवारांना पक्क्या परवाना चाचणीसाठी अनुपस्थित उमेदवारांच्या जागी समायोजित करावे. (प्रतिनिधी)