शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे रक्त पडतेय कमी

By admin | Updated: May 4, 2015 03:16 IST

उन्हाची दाहकता व शहरवासीयांनी स्वत:साठी दिलेला वेळ, त्यातून भटकंतीत दाखविलेली व्यस्तता यातून रक्तदान शिबिरांची वाणवा असल्याचे चित्र आहे.

अंकुश जगताप, पिंपरीउन्हाची दाहकता व शहरवासीयांनी स्वत:साठी दिलेला वेळ, त्यातून भटकंतीत दाखविलेली व्यस्तता यातून रक्तदान शिबिरांची वाणवा असल्याचे चित्र आहे. परिणामी, शहरातील रक्तपेढ्यांमध्ये मागणीच्या तुलनेत ४० टक्के कमी रक्तसाठा असल्याची बाब निदर्शनास आली आहे. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरामध्ये वाढलेले ऊन आणि त्यातून असह्य झालेला उकाडा यांमुळे नागरिक पुरते हैराण होत आहेत. त्यामुळे बहुतेक खासगी, तसेच शासकीय कामगार वर्ग, उद्योजक सुटीचे नियोजन करून थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले आहेत. जे नागरिक शहरात आहेत ते उन्हापासून बचाव करण्यातच दंग आहेत. इतर दिवसांमध्ये शहरामध्ये विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे, ज्येष्ठ नागरिक मंडळे, तरुण मंडळे, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील संस्था, वाढदिवसाचे औचित्य साधून बहुतेक राजकीय कार्यकर्ते आरोग्य तपासणीबरोबरच रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. त्यामुळे रक्तपिशव्यांचा पुरवठा नियमित व्हायचा. मात्र, सध्या उन्हाची दाहकता अधिक असल्याने रक्तदात्यांकडून किती प्रतिसाद मिळेल, याचा विचार करून अशा संस्था, मंडळांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा विचार केला जात नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा काळ सरला असल्याने उत्साही राजकीय कार्यकर्तेही अशा शिबिरांसाठी निरुत्साही झाल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवत आहे. रक्तासाठी नातवाइकांना धावाधाव करावी लागत आहे.शहरात महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात क्रांतिवीर चापेकर रक्तपेढी आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील विश्वेश्वर रक्तपेढी, खराळवाडी येथील ‘पीएसआय’ या मोठ्या रक्तपेढी आहेत. इतरही खासगी रुग्णालयांमधील रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी अनेक पेढ्यांमधील रक्तसाठा घटत असल्याची माहिती संबंधितांनी दिली. मात्र, खासगी पेढ्या असल्याने अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.