शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

सॅटेलाईटद्वारे रेडीरेकनरचे दर

By admin | Updated: February 28, 2016 03:45 IST

राज्यातील विविध महामार्गालगत असलेल्या जागांचे दर जास्त असतात. त्याची खरेदी-विक्री होत असताना त्यावर भरण्यात येणारे मुद्रांक शुल्कही जास्त असल्याने, पत्ता

पुणे : राज्यातील विविध महामार्गालगत असलेल्या जागांचे दर जास्त असतात. त्याची खरेदी-विक्री होत असताना त्यावर भरण्यात येणारे मुद्रांक शुल्कही जास्त असल्याने, पत्ता देताना जागा मालक महामार्गाचा उल्लेख टाळताना दिसून येतात. हे रोखण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नवी योजना तयार केली असून त्यासाठी ते सॅटेलाईट मॅपची मदत घेणार आहे. त्यामुळे खरेदी-विक्री झालेल्या जागेची नोंद करताना हा मॅप ही जागा महामार्गाच्या लगत आहे का, हे सांगेल. त्यामुळे बुडणारा महसुल शासनाला परत मिळणार आहे.याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक डॉ. रामास्वामी एन. यांनी माहिती दिली की, राज्यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांचे जाळे आहे. या महामार्गांच्या बाजूंना असलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र रेडीरेकनरचे दर कार्यरत आहेत. हे दर त्या भागातील इतर जागांच्या तुलनेत जास्त आहेत. हे जास्तीचे दर भरले जात नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. त्यासाठी जमिन खरेदी-विक्रीची नोंद करीत असताना पत्त्यात महामार्गाचा उल्लेख जागा मालक टाळतात. हे ओळखून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागने नवी योजना आखली आहे. यामध्ये जिओग्राफीक इनफॉरर्मेशन सिस्टीमच्या (जीआयएस) माध्यमातून सॅटेलाईट मॅपचा वापर करण्यात येणार आहे. या मॅपमध्ये दिसणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असलेल्या जागांचे सर्व सर्व्हे क्रमांक या मॅपवर टाकण्यात येणार आहे. यासाठी नागपूरमधील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरची (एमआर सॅक) मदत घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून या सॅटेलाईट मॅपवर जागांचे सर्व सर्वे क्रमांक टाकण्यात आले आहेत आणि ही सिस्टीम आॅनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी करताना जागेच्या केवळ सर्वे क्रमांकावरून ती जागा महामार्गालगत असल्याचे सिस्टीम सांगेल आणि त्यातून महामार्गाचा जो जादाचा रेडीरेकनर दर आहे तो शासनाला मिळेल. ही नवी सिस्टीम येत्या १ एप्रिल २०१६ पासून कार्यान्वीत होणार असल्याची माहितीही डॉ. रामास्वामी यांनी दिली.१५० कोटींचा महसूल वाढण्याची अपेक्षा या नव्या सिस्टीममुळे आतापर्यंत सर्रासपणे बुडविण्यात येणारा महसूल यापुढे बुडविता येणार नाही. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत वर्षाकाठी १५० कोटी रुपयांचा महसूल वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. रामास्वामी यांनी दिली.गावठाणांमधील नोंदणीसाठीही सॅटेलाईट मॅपची मदतराज्यात अनेक छोटी-मोठी गावठाणे आहेत. अनेक गावठाणांचा विस्तारही करण्यात आला आहे. या गावठाणांमधील जागांची खरेदी-विक्री झाल्यानंतर त्याची नोंदणी करताना संबंधित जागा जर गावठाणाच्या सीमेला लागून असेल तर ती जागा गावठाणात नसल्याचे सांगितले जात होते आणि शेतीच्या रेडीरेकनर दराने त्याचा मुद्रांक शुल्क भरला जात होता. आता या फसवणुकीलाही चाप बसणार असून, या योजनेत गावठाणांमधील जागांच्या सर्व्हे क्रमांकाच्या नोंदी सॅटेलाईट मॅपवर केल्या जाणार आहेत. त्यामुळे यातूनही शासनाला महसूल वाढून मिळेल, अशी माहिती डॉ. रामास्वामी यांनी दिली.