शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दोषींकडून सुरू होणार वसुली

By admin | Updated: March 5, 2016 00:53 IST

रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रुपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले आहे

पुणे : रूपी सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा करण्यास जबाबदार ठरविण्यात आलेल्या दोषी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रुपयांच्या वसुलीचे काम सहकार विभागाने हाती घेतले आहे. यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात आल्यानंतर दोषींना अपील करण्यासाठी देण्यात आलेली ४ आठवड्यांची मुदत संपल्याने त्यांच्यावरील कारवाईचा सहकार विभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यात या सर्वांना वसुलीसाठीच्या नोटिसा पाठविण्यात येणार आहेत.बँकेतील आर्थिक घोटाळ््यांची चौकशी अधिकारी पणन संचालक किशोर तोष्णीवाल यांच्यामार्फत करण्यात आली आणि त्याचा अहवाल त्यांनी २ फेब्रुवारीला जाहीर केला. यात आर्थिक घोटाळयासाठी १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आणि त्यांच्याकडून १ हजार ४९० कोटी ६१ लाख १०८ रूपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आठवडयाभरात हा अहवाल तोष्णीवाल यांनी सहकार आयुक्तांकडे सुपूर्त केला. हा अहवाल सुपूर्त केल्यानंतर पुढील ४ आठवडे या दोषी संचालक, अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपिल करण्यासाठीची मुभा न्यायालयाने दिली होती. त्या काळात त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुभ्याचा हा कालावधी या आठवडयात संपला. त्यामुळे पुढील आठवड्यात वसुलीची कारवाई करण्यासाठी सहकार विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात येणार असून त्यानंतर थेट वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी गरज पडल्यास दोषींच्या स्थावर मालमत्तेच्या जप्तीचीही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष ईश्वरदास चोरडिया, संचालक अनंतराव कुलकर्णी, काशिनाथ पेमगिरीकर, माधव नातू, गायत्रीदेवी पटवर्धन, गजानन देव, शशिकुमार भिडे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांच्यासह १५ संचालक व ५४ तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात येणार आहे.