शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक

By admin | Updated: November 10, 2014 23:05 IST

भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील.

पुणो : भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे  साठे संपतील.  भविष्याची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अणुऊर्जा आणि सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी  जैवइंधनाऐवजी अणुऊर्जा व सौरऊर्जेवर असणो आवश्यक आहे. यासाठी ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना करणो आवश्यक आहे, असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
बडोदे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या गंगुताई पटवर्धन स्मृतिव्याख्यानमालेत ‘भारताची दूरगामी ऊर्जा सुरक्षितता’ या विषयावर काकोडकर बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत अभ्यंकर, उपाध्यक्ष सुनीता साठे, विश्वस्त राजेंद्र माहुलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अणुऊर्जा व सौरऊर्जेच्या वापरातून आपण हायड्रोजन, वीज, हायड्रोकार्बन इंधन, बायोमास यांचीही निर्मिती करू शकतो. 
ते करण्यासाठी आणि वापर वाढविण्यासाठी ऊर्जा कार्यक्रमात बदल आवश्यक आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, की सध्या आपण वापरणा:या एकूण ऊर्जेपैकी एक तृतीयांश ऊर्जा इतर देशांकडून आयात करतो. पुढील 2क् वर्षात हे प्रमाण खूप वाढून सुमारे 6क् टक्के ऊर्जा आपण इतर देशांकडून आयात करू. सध्या आपण जैवइंधनावर ऊर्जा निर्मितीसाठी अवलंबून आहोत. सन 2क्3क् र्पयत तेलावर आपल्याला 2 हजार बिलियन रुपये, कोळशावर 7 हजार बिलियन रुपये खर्च करावे लागतील. हे आपल्याला परवडणारे नाही. जगात एकूणच ऊर्जेच्या संसाधनाचा तुटवडा भासू लागेल. यावर भारताला पर्याय अणुऊर्जा आणि सौरऊर्जेचाच आहे. 
सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी खूप जागा लागेल. मात्र, आपल्याकडील लोकसंख्येची घनता पाहता ते जास्त प्रमाणात शक्य होणार नाही. त्यामुळे अणुऊर्जेचा वापर वाढवावा लागेल. आपल्या विकासासाठी अणुऊर्जा ही 
अपरिहार्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.  (प्रतिनिधी)