पुणे : नयना पुजारी हिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागला असला तरी तिची ओळख पटू शकत होती़ तिचे कपडे, मंगळसूत्र, जोडव्यांवरून तिचे पती अभिजित पुजारी यांनी तो मृतदेह तिचाच असल्याचे ओळखले. त्यांची साक्ष विश्वासार्ह असल्याची माहिती युक्तिवाद करताना सरकार पक्षातर्फे सोमवारी न्यायालयात देण्यात आली. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचा खून करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सुरू असून सरकार पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद सुरू आहे. पुढील सुनावणी दि. १७ ला होणार आहे.नयना पुजारी हिचे पती अभिजित पुजारी यांनी साक्षीमध्ये नयना हिचा दिनक्रम व घटनेच्या दिवशीनयना रात्री आठ वाजता कंपनीतून बाहेर पडल्यावर काय काय झाले, याची संपूर्ण माहिती दिली असल्याचे सांगून विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की नयनाचा शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली़ त्यानंतर सकाळी व दुसऱ्या दिवशी नयनाच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढले गेल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली़ (प्रतिनिधी)
कपडे, मंगळसूत्रावरून नयनाला ओळखले
By admin | Updated: February 14, 2017 02:16 IST