शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

गोसावीवस्तीवर पुन्हा दरोडेखोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: December 25, 2014 04:55 IST

कन्हेरी (ता. बारामती) येथे मागील आठवड्यात चव्हाणवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती आज झाली

बारामती/काटेवाडी : कन्हेरी (ता. बारामती) येथे मागील आठवड्यात चव्हाणवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती आज झाली. कन्हेरी व पिंपळी गावदरम्यान असलेल्या गोसावी वस्तीवर आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास १० ते १२ दरोडेखोरांनी राजेंद्र गोसावी यांची घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील तरुणांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे दरोडेखोर तेथून पळून गेले. जाताना घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून गेल्याचे सांगण्यात आले. जाताना रोख रक्कम, मोबाईल, दीड तोळ्याचे गंठण, असा ऐवज लुटून नेला. या घटनेनंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलीस पथक घटनास्थळी गेले. मागील आठवड्यात चोरट्यांनी चव्हाणवस्तीवर धुमाकूळ घातला होता. घरातील सर्व ऐवज लुबाडून नेला होता. तसेच, धारदार वस्तूंनी घरातील लोकांवर हल्ला केला होता. त्या भीतीमुळे परिसरातील शेतकरी कुटुंब गावातील घरांमध्ये वास्तव्यासाठी गेले आहेत. आज कन्हेरीच्या गावातीलच राजेंद्र गोसावी यांच्या वस्तीच्या घरावर १० ते १२ दरोडेखोरांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दगडफेकीला सुरुवात केली. चव्हाणवस्तीवरील हल्ल्यानंतर गोसावी यांचे सर्व कुटुंब गावात राहण्यासाठी गेले आहेत. परंतु, वस्तीवर पाळीव जनावरे असल्यामुळे किरण गोसावी, वैभव गोसावी हे दोघे बंधू घरात होते. दरोडेखोरांनी घराभोवती वेढा टाकला होता. त्यातून प्रसंगावधान राखून दरोडेखोरांच्या तावडीने दोघे गावाच्या दिशेने पळाले. तरीदेखील दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग करून हातातील काठ्या फेकून मारल्या. त्यांचा हल्ला चुकवत दोघे गावापर्यंत पोहोचले. वडिलांना त्यांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस पाटील शंकर काळे यांना कळविले. काळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यापूर्वी दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले होते. त्याचबरोबर १० हजार रुपये रोख, दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, मोबाईल त्यांनी या दरम्यान चोरून नेला. या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी सांगितले, की १० ते १५ जणांच्या टोळक्याने हा हल्ला या वस्तीवर केला. तरुण जखमी झाला आहे. (वार्ताहर)