शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रीअल इस्टेट (पुरवणी मुख्य लेख)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:09 IST

-सागर सुखवाणी, संचालक सुखवाणी बिल्डटेक प्रचलित ‘कोविड-19’ साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाच हादरून गेला आहे आणि त्याचबरोबर आपले ...

-सागर सुखवाणी,

संचालक सुखवाणी बिल्डटेक

प्रचलित ‘कोविड-19’ साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पायाच हादरून गेला आहे आणि त्याचबरोबर आपले आयुष्यही बदलले आहे. परंतु, त्यातूनही व्यक्ती आणि व्यवसायिकांना केवळ आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे तर, उद्रेकाच्या या संपूर्ण काळामध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांसह डिजिटल जगातील संभाव्य संधी वाढविण्याचा पर्याय मिळाला आहे. या आव्हानात्मक काळातही, व्यवसायात चांगली वाढ करून आम्ही तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन या नवीन जगाच्या गरजा भागवून पारंपारिक पद्धतीमध्ये सुधारणा केल्या आहेत, अशी माहिती सुखवाणी बिल्डटेकचे संचालक सागर सुखवाणी यांनी दिली.

तंत्रज्ञानाने जवळजवळ प्रत्येक क्षेत्राची आणि उद्योगाची नव्याने व्याख्या केली आहे. रिअल इस्टेटही त्याला अपवाद नाही. कोविड-19 साथीच्या रोगामुळे डिजिटायझेशनची गती वाढली आहे आणि पारंपारिक व्यावसायाचे मॉडेलही बदलत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ करत असताना, तंत्रज्ञानाची ही गती टिकविण्यासाठी रामबाण औषध म्हणून काम करत आहे. ‘फेस-टू-फेस’ मीटिंगची जागा स्काईप आणि झूमवरील व्हर्च्युअल सत्रांनी घेतली आहे. दुकानामध्ये जाऊन खरेदी करण्याची जागा व्हिडिओ शॉपिंग आणि ई-कॉमर्सने घेतली आहे. रिअल इस्टेटमध्ये, ग्राहकांच्या अनुभवांना चालना देण्यासाठी, मजबूत ब्रँड रिकॉल तयार करण्यासाठी आणि ग्राहकांची गुंतवणतूक वाढविण्यासाठी विकसक तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग करीत आहेत.

कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आर्थिक परिणामांमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर, रिअल इस्टेट क्षेत्रासह, विविध उद्योगांना नवीन व्यवसाय करण्याचे मार्ग शोधण्याला आणि त्यानुसार बदल करण्यास भाग पाडले आहे. असाच एक सकारात्मक बदल म्हणजे तंत्रज्ञानाचा वाढता वापर होय. रिअल इस्टेट उद्योगातील तंत्रज्ञानाचे सर्वांत महत्त्वाचे आणि प्रचलित उदाहरण म्हणजे ऑटोमेशन होय. आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचे बाय-प्रॉडक्ट म्हणून, रिअल इस्टेटमध्ये ऑटोमेशन हे विविध मार्केटींग फंक्शन्स आणि व्यवसाय प्रक्रियांमध्ये दिसून येत आहे. ऑटोमेशन व्यापकपणे वापरलेली काही उदाहरणे म्हणजे वेबसाइट फॉर्मद्वारे लीड जनरेशन, ड्रीप ईमेलद्वारे किंवा ऑटोमेटेड वर्क फ्लोद्वारे लीड नर्चरिंग करणे होय. टास्क मॅनेजमेंट, खात्यांचे ऑटोमेशन, ''स्पॅक्टोरा'' द्वारे मालमत्तांची पाहणी करणे आदींचा यात समावेश आहे.

रिअल इस्टेट व्यवसाय अनेक वर्षांपासून सोडविण्याचा प्रयत्न करीत असलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्रांचा वापर आणि त्यांच्यावरील अवलंबन होय. मध्यभागी डिजिटल प्लॅटफॉर्म ठेवून रिअल इस्टेट प्रक्रियेला सुलभ करणे, ही एक मोठी झेप आहे. जी व्यवसायाला ‘स्टे अ‍ॅट होम’द्वारे खरेदीदार आणि विक्रेत्यांची सेवा करण्यास मदत करत आहे. रिअल इस्टेटमधील या तंत्रज्ञानाचे फायदे अनेक आहेत. त्यामध्ये विश्वासार्ह सुरक्षितता आणि संग्राह्यता ऑपरेशन खर्च कमी करणे, रिअल टाईम सामाईकरण आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी होय.

तज्ज्ञांच्या मते ‘कोविड १९’ने भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये डिजिटल साधने स्वीकारण्यास चांगलाच वेग आणला आहे. त्यांचा अनुभव असा आहे की, प्रॉपर्टी शोधणे तसेच ती शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करता येते. या आव्हानाच्या काळात कंपन्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. व्यवसायामध्ये विशेषत: रिअल इस्टेट उद्योगामध्ये एका नवीन डिजिटल आणि तांत्रिक क्रांतीचीही सुरुवात असू शकते.

(सागर सुखवाणी यांचा फोटो जेएमएडीट वर आहे)