शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेडी रेकनरमध्ये होणार ८ टक्क्यांची दरवाढ

By admin | Updated: April 2, 2016 01:27 IST

रेडी रेकनरमध्ये झालेल्या दरवाढीवरून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी

पुणे : रेडी रेकनरमध्ये झालेल्या दरवाढीवरून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी ८ टक्के तर शहरी भागात सरासरी ५.०७ टक्के इतकी दरवाढ झाली आहे. राज्याचे नोंदणी व मुद्रांक महासंचालक डॉ. एन. रामस्वामी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत राज्यातील रेडी रेकनर दरवाढीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘वर्षभरात झालेले खरेदी-विक्रीचे व्यवहार, बाजारातील ट्रेंड, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून दरवर्षी रेडी रेकनरचे दर निश्चित केले जातात. यंदा बांधकाम व्यवसायात प्रचंड मंदीचे वातावरण असल्याने दरवाढ करू नये, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनी केली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरदेखील रेडी रेकनरचे दर ठरविताना विचार करण्यात आला. यापुढे दरवर्षी १ एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. दर निश्चित करताना खरेदी-विक्री व्यवहारांचा विचार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या विभागांतील १४३ प्रकल्पांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये केवळ १४ प्रकल्पांमध्ये शासनाच्या रेडी रेकनरच्या दरापेक्षा कमी किंमत असल्याचे निदर्शनास आले. अन्य सर्व प्रकल्पांमध्ये रेडी रेकनरपेक्षा २० ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक दर असल्याचे स्पष्ट झाले, असे रामस्वामी यांनी सांगितले. सर्वाधिक दरवाढ सोलापूर जिल्ह्यातसोलापूर जिल्ह्यातील बांधकामांचे दर रेडी रेकनरच्या दरांपेक्षा खूपच जास्त असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समिती व लोकप्रतिनिधींची मागणी विचारात घेऊन सोलापूरमध्ये १६.३८ टक्के दरवाढ करण्यात आली. सोलापूरनंतर सर्वाधिक ९.८८ टक्के वाढ पुणे जिल्ह्यात आहे. सर्वांत कमी सरासरी ५ टक्के वाढ कोकणात करण्यात आली आहे.मागील पाच वर्षांत सर्वांत कमी दरवाढराज्यात बांधकाम व्यवसायात असलेले मंदीचे वातावरण व दुष्काळाची परिस्थिती यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा रेडी रेकनरमध्ये सर्वांत कमी सरासरी ७ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सन २०१०-११मध्ये १४ टक्के, सन २०११-१२मध्ये १८ टक्के, सन २०१२-१३मध्ये ३७ टक्के, सन २०१३-१४मध्ये २७ टक्के आणि२०१४-१५मध्ये २२ टक्के दरवाढ करण्यात आली होती.