शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमध्ये नागरी समस्यांना फुटली वाचा

By admin | Updated: May 12, 2016 01:27 IST

थेट वाचकांशी नाळ जोडण्याच्या व नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ सुरू करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात

दौंड : थेट वाचकांशी नाळ जोडण्याच्या व नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ सुरू करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून करण्यात आली. या निमित्ताने कचऱ्यापासून रस्त्यापर्यंत आणि पाणीटंचाईपासून ते वाढत्या गुन्हेगारीपर्यंतचे सारे प्रश्न नागरिकांनी ऐरणीवर आणले व त्यातून लोकप्रश्नांचा जागर मांडण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकारी, राजकीय नेते व शासकीय अधिकारी यांनी नागरिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड दिले. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या वेळी सामाजिक आणि वैयक्तिक भेडसावणाऱ्या समस्यांचा भडीमार निसंकोचपणे जनतेने प्रश्नांच्या माध्यमातून उपस्थित केला. दरम्यान, उपस्थित विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, आरोग्य अधिकारी डॉ. मीना भट्टड, एसटी आगारप्रमुख विलास गावडे, पाटबंधारे अभियंता रवींद्र जाधव, वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता एन. एन. डोंबाळे, सहायक अभियंता संदीप रणदिवे आदी उपस्थित होते़आरोग्य, रस्ते, वीज, पाणी यासह विविध प्रश्नांचा उहापोह या वेळी झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जगदाळे म्हणाले की, पाणीटंचाई लक्षात घेता भीमानदीतून पाणी शहरासाठी आणावे, की ज्याचा फायदा जनतेला कायमस्वरूपी होईल. असा प्रश्न उपस्थित केला. यावर नगरपरिषदेचे नगरसेवक राजू बारवकर म्हणाले की, भीमा नदीतून पाणी आणणे आर्थिकदृष्ट्या नगरपरिषदेला परवडणारे नाही. अ‍ॅड. अजित बलदोटा म्हणाले की, प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काही कार्यालये आहेत. तेव्हा वयोवृद्धांना तिसऱ्या मजल्यावर जावे लागते. व्यवस्था असताना लिफ्ट का बसवली गेली नाही, मात्र या प्रश्नाला महसूल खात्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. वास्तवात प्रशासकीय इमारतीत लिफ्ट बसविणे जनतेच्या हितासाठी असल्याची वस्तुस्थिती आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेश मंथने म्हणाले की, शासकीय रुग्णालयात डॉक्टर सहकार्य करीत नाहीत. यावर आरोग्य पथकाचे अधिकारी डॉ. मीना भट्टड म्हणाल्या की असं शक्यतो होत नाही. तरीदेखील कुणावरही अन्याय होणार नाही, याची दखल घेतली जाईल. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खटी म्हणाले की, नागरी सुविधा केंद्र हे जुन्या तहसील कचेरीत आहे, ते नव्या प्रशासकीय इमारतीत कधी स्थालंतरित करणार यावर नायब तहसीलदार सजन हंकारे म्हणाले की, वरिष्ठांना पाठपुरावा करुन तातडीने प्रशासकीय इमारतीत सदरचे कार्यालय कार्यरत कसे होईल, याकडे लक्ष दिले जाईल. नगरसेवक जब्बार पानसरे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात औषधांचा आणि डॉक्टरांचा तुटवडा आहे, तर रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ येते. आरोग्य पथकाच्या डॉ. मीना भट्टड म्हणाल्या की, एखाद्या रुग्णाला खासगी रुग्णालयात जावे लागले असेल, मात्र असे कायम होत नसते. याची ग्वाही यांनी दिली. दौंड नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते बादशहा शेख म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयात ५0 ऐवजी १00 खाटा झाल्या पाहिजेत. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. मनसेचे युवा कार्यकर्ते सचिन कुलथे म्हणाले की, दौंडच्या सफाई कामगारांचे आरोग्यच धोक्यात आहे. तेव्हा जनतेचे आरोग्य अबाधित कसे ठेवतील, सफाई कामगार इमारतीची दुरावस्था आहे, त्यांना विजेचा आणि पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याची वस्तुस्थिती आहे. सामाजिक कार्यकर्त्या मायादेवी मोरे, नगरसेवक अनिल साळवे, अनिता जोगदंड, नीलेश चितळे, हरेश ओझा, डॉ. प्रेमकुमार भट्टड, प्रशांत धनवे, दौंड केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष झावरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भंडारी, घरेलु संघटनेच्या अध्यक्षा ऊर्मिला भूमकर, दौंड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, भाजपाचे शहराध्यक्ष फिरोज खान , दादू गजभिव आदींनी चर्चेत सहभाग घेतला.>येथेही ‘तू तू...मै मै’नेहमी नगरपरिषदेत सत्ताधारी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया आणि विरोधी गटनेते ज्येष्ठ नगरसेवक बादशहाभाई शेख यांच्यात तू तू मै मै होत असते. तोच अनुभव या व्यासपीठावरही आला. पाणीप्रश्नावरून दोघांमध्येही जोरदार तू तू मै मै झालेली दिसली. >नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तेव्हा शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झाले पाहिजे. यावर विद्युत महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. एन. डोंबाळे म्हणाले की, वीजबिल माफ करायचे हे राज्य शासनाच्या धोरणावर अवलंबून आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा केल्यास वीजबिल यातून काहीतरी मार्ग निघू शकतो.- पोपटराव ताकवणे,काँग्रेसचे ज्येष्ठे नेते पानशेत, वरसगाव धरणग्रस्तांना दौंड तालुक्यातील जमिनी दिल्या. मग दौंडला पाणी देण्यासाठी विरोध का? याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठवावा; कारण पुण्यातील नगरसेवकांना माहिती झाले पाहिजे की, खडकवासला धरणाच्या पाण्यावर दौंडकरांचा हक्क आहे. - अनिल सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख